esakal | बिसूरमध्ये सापडली दुर्मिळ धूळनागीण; घरात स्वच्छता सुरु असताना आढळलासर्प
sakal

बोलून बातमी शोधा

Rare snake found in Bisur-Sangali while cleaning the house

घराची स्वच्छता करताना अडगळीत बसलेल्या धूळनागीणला पकडून जीवदान दिले. बिसूर (ता. मिरज) येथील सर्पमित्र व इन्साफ फौंडेशनचे जिल्हाध्यक्ष जावेद शेख यांनी अतिदुर्मिळ धूळनागीण या सापाला पकडून अधिवासात सोडण्यात आले. 

बिसूरमध्ये सापडली दुर्मिळ धूळनागीण; घरात स्वच्छता सुरु असताना आढळलासर्प

sakal_logo
By
जयसिंग कुंभार

सांगली : घराची स्वच्छता करताना अडगळीत बसलेल्या धूळनागीणला पकडून जीवदान दिले. बिसूर (ता. मिरज) येथील सर्पमित्र व इन्साफ फौंडेशनचे जिल्हाध्यक्ष जावेद शेख यांनी अतिदुर्मिळ धूळनागीण या सापाला पकडून अधिवासात सोडण्यात आले. 

बिसूर-खोतवाडी रस्त्यावर एका घरात स्वच्छता सुरु असताना हा सर्प आढळला. शेख यांच्याशी संपर्क केल्यानंतर त्यांनी तातडीने येउन साप कोणत्या जातीचा आहे, याची खातरजमा केली.

गडद तपकिरी रंगाच्या या सापाच्या अंगावर खवले असल्याने त्याचे रुप भयानक दिसत होते. प्रारंभी नाग असावा, असा समज होता. पण तो धूळनागीण नावाचा या भागातील अतिदुर्मिळ व बिनविषारी सर्प असल्याचे स्पष्ट झाले.

सर्पमित्र शेख म्हणाले, फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान सापाची मादी 5 ते 10 अंडी घालते. पिलांच्या अंगावर ठराविक अंतरावर पांढरे आडवे पट्टे असतात. कालांतराने ते नाहीसे होतात. त्याचे खाद्य हे उंदीर असून गवत, झुडूप, बिळे, दगडांच्या फटीत किंवा घरात जाउन ते भक्ष्यांच्या शोधार्ध असतात.

नवरात्रीचा सण तोंडावर आल्याने घरोघरी स्वच्छतेची कामे सुरु आहेत. अशावेळी अडगळीत, अडचणीच्या जागी एखादा सर्प आढळल्यास भितीने गाळण उडते. अशावेळी न घाबरता जवळच्या सर्पमित्रांना बोलवावे. कोणत्याही परिस्थितीत सापाला न मारण्याचे आवाहन त्यांनी केले. 

संपादन : युवराज यादव

loading image