esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रभूषण महिला मंडळाचे विधायक पाऊल : विधवांना दिला दुर्गामातेच्या आरतीचा मान

राष्ट्रभूषण महिला मंडळाचे विधायक पाऊल : विधवांना दिला दुर्गामातेच्या आरतीचा मान

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी : सौभाग्याचे लेणं लाभलेल्या स्त्रीला जेव्हा अचानक वैधव्य येते. तेव्हा तिची अवहेलना सुरू होते. आतापर्यंत तरी हेच चित्र दिसत होते, मात्र या चालीरिती हळूहळू बदलत आहेत. विधवांना पुन्हा पहिल्यासारखे जीवन जगण्याचा अधिकार आहे, ही गोष्ट हळूहळू का होईना, पण समाजात रुजत चालली आहे. येथील राष्ट्रभूषण महिला मंडळाने भागातील विधवा माता-भगिनींच्या हस्ते विधीवत पूजा करून दुर्गामातेच्या आरतीचा मान त्यांना दिला. मंडळाचे हे पाऊल बदलत्या समाजमनाचेच एक प्रतिबिंब आहे.

राष्ट्रभूषण नवरात्र उत्सव मंडळातर्फे विक्रमनगर घोरपडे मळा परिसरामध्ये तीस वर्षे नवरात्र विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा केला जातो. कोणत्याही शुभ कार्यामध्ये विधवा महिलांना दुय्यम स्थान दिले जाते. किंबहुना त्या महिला स्वतःला समाज काय म्हणेल, या भीतीपोटी त्या शुभकार्यात नेहमी मागे राहतात. पुढे येत नाहीत, पण राष्ट्रभूषण मंडळाचे सदस्य संदीप बाबर यांच्या संकल्पनेतून व राष्ट्रभूषण महिला मंडळाच्या पुढाकाराने भागातील विधवा माता-भगिनींना नवरात्र उत्साहात सामावून घेतले. विधवा महिलांच्या हस्ते दुर्गामातेची विधीवत पूजा करून आरतीचा मान त्यांना दिला. नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने शुभ कार्यात सहभागी होण्यासाठी विधवा महिलांना प्रोत्साहन करण्याचा प्रयत्न मंडळातर्फे केला.

या विधायक कार्यक्रमात कलाप्पाण्णा आवाडे जनता सहकारी बँकेचे संचालक स्वप्नील आवाडे, सौ. वैशाली आवाडे, सौ. स्नेहा पाटील, सौ. भक्ती बोंगार्डे यांची प्रमुख उपस्थिती होती. स्वागत व प्रास्ताविक रिमा नडाळे हिने केले. भारत बोंगार्डे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी हेमंत पाटील, भारत तारळेकर, गणेश नेमिष्टे, परसराम चौगुले, तोफिक मुल्ला, शिवाजी बोंगार्डे, विशाल नरके, प्रवीण बोंगार्डे, गणेश चौगुले, सुनील माने, शशिकांत वाडकर, विनायक नगारे, सुभाष तुंबगी, रोहित नागराळे, गोपाल झंवर आदींनी परिश्रम घेतले.

loading image
go to top