पोलिस दल अॅक्शन मोडवर; रत्नागिरीत सर्व दुकाने आजपासून बंद

पोलिस दल अॅक्शन मोडवर; रत्नागिरीत सर्व दुकाने आजपासून बंद

रत्नागिरी : जिल्ह्यात आज पासून लॉकडाऊनची(lockdown) कडक अंमलबजवाणी होईल. मुख्यमंत्र्यी उद्धव ठाकरे (C M Uddhav Thackeray)यांनी आदी जनजागृती करा नंतर अॅक्शन घ्या, अशा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार जनजागृती करण्यात आली आहे. जिल्ह्यात ५७ नाकाबंदी पॉइंट लावले आहेत. शहरांमध्ये स्वंतत्र तपासणी केंद्र आहेत. पोलिसांबरोबर आरोग्य पथकही तैनात केली आहेत. विनाकारण फिरणाऱ्या, संचारबंदीचे नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. पोलिस दल अॅक्शन मोडवर असेल, असा कडक इशारा जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग (Superintendent of Police Dr. Mohit Kumar Garg) यांनी 'सकाळ'शी बोलताना दिला. (ratnagiri-lockdown-update-Police-force-in-action-mode-in-ratnagiri-kokan-news)

कोरोना संसर्गाचा प्रसार जिल्ह्यात थांबण्याचे नाव घेईना. काल पुन्हा ६५५ कोरोनाबाधित सपाडले. दिवसेंदिवस बाधितांची संख्या वाढत असल्याने रेड झोनमध्ये असलेल्या राज्यातील १८ जिल्ह्यांमध्ये रत्नागिरी जिल्ह्याचा समावेश झाला आहे.पॉझिटिव्ह रेट आणि मृत्यूदर अधिक असल्याने जिल्ह्यावर कडक निर्बंध लागू केले आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यात आठ दिवसाचा कडकडीत लॉकडाउन प्रशासनाने जाहीर केला आहे. १५ मे पासून संचारबंदी होती; मात्र त्याची प्रभावी अंमलबजवाणी झाली नसल्याचे नागरिकांचे, प्रशासनाचे मत आहे. त्यामुळे आजपासून होणाऱ्या लॉकडाउनबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्याशी चर्चा केली.

ते म्हणाले, जिल्ह्यात आजपासून लॉकडाउनची कडक अंमलबजावणी होईल. जनतेमध्ये आदी जनजागृती करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या होत्या. त्यानुसार सायकल रॅली काढून नागरिकंना अवगत केले आहे. आजपासूनआम्ही अॅक्शन मोडवर असणार आहे. त्यासाठी जिल्ह्यात ५७ ठिकाणी तपासणी केंद्र उभारण्यात आली आहेत. रत्नागिरी शहरात ३ तपासणी केंद्र आहेत. जिल्ह्यात प्रत्येक शहर आणि गावात एक किंवा दोन नाकाबंदी केंद्र आहेत. विनाकारण फिरणे, संचारबंदीचे उल्लंघन करणे आदींची गय केली जाणार नाही. कडक कारवाई केली जाईल. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्याचा प्रशासनाबरोबर पोलिस दलही खांद्याला खांदा लागून काम करीत आहे.

गावा-गावात लवकरच प्रशिक्षित पथके

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पोलिस दलानेही जिल्ह्यातील ४२ गावे दत्तक घेतली आहेत. संसर्गाला प्रतिबंद घालण्यासाठी चाचण्या वाढवणे महत्त्वाचे आहे. आरोग्य विभागाचे ते काम असले तरी जिल्ह्यात प्रशिक्षित वॉरेंटिअरची पथके तयार केली जाणार आहेत. त्यांच्या माध्यमातून चाचण्या वाढविण्याचा आमचा प्रयत्न आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड, जिल्हा आरोग्य अधिकारी बबिता कमलापुरकर आदींच्या मदतीने गावागावात चाचण्या वाढविल्या जाणार आहेत, असे गर्ग म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com