
Koyna Dam Hydroelectric Project : ३१ मे रोजी संपलेल्या तांत्रिक वर्षात कोयना धरणाच्या जलविद्युत प्रकल्पातून ३२६९.०६ मेगावॉट अवर्स इतकी विक्रमी वीजनिर्मिती झाली आहे. ही वीजनिर्मिती पश्चिमेकडील जलविद्युत टप्प्यांमधील ६७.५० टीएमसी साठ्याच्या वापरातून झाली आहे. त्यामुळे शासनाला सुमारे १४४ कोटी रुपयांचा आर्थिक लाभ झाला आहे.