esakal | सावधान! कोव्हिड सेंटरमध्ये नातेवाईकांचा वावर ठरतोय घातक
sakal

बोलून बातमी शोधा

सावधान! कोव्हिड सेंटरमध्ये नातेवाईकांचा वावर ठरतोय घातक

सावधान! कोव्हिड सेंटरमध्ये नातेवाईकांचा वावर ठरतोय घातक

sakal_logo
By
अवधूत पाटील

गडहिंग्लज : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी (Covid -19) बाधितांपासून सुरक्षित अंतर राखणे महत्त्वाचे आहे; पण कोरोना सेंटर, (covid care center) रुग्णालयातील वास्तव वेगळेच आहे. जेवणाचा डबा देण्यापासून अन्य कारणांसाठी नातेवाईकांचा वावर वाढला. परिणामी, हे नातेवाईक कोरोनाचे वाहक ठरत असल्याचे चित्र आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली.

बाधिताच्या संपर्कात आल्यामुळेच कोरोनाचा संसर्ग होतो. त्यामुळे बाधितांचा संपर्क येणार नाही, याची काळजी घेणे आवश्‍यक बनते. परिणामी, कोरोना बाधित, संशयित रुग्णांचे अलगीकरण करण्याच्या मार्गदर्शक सूचना आहेत. कोरोना बाधितांवर (corona positive) अलगीकरणातच उपचार केले जातात. त्यासाठी कोविड केअर सेंटर, समर्पित कोविड रुग्णालयांची व्यवस्था केली आहे. गडहिंग्लज तालुक्‍यासाठी (gadhingalaj) शेंद्री रोडवर दोन इमारतींमध्ये कोविड केअर सेंटर आहे. तर येथील उपजिल्हा रुग्णालयाला समर्पित कोविड रुग्णालय केले आहे.

हेही वाचा: HRCT 10, फुफ्फुस 40 टक्के बाधित; तरीही जगण्याच्या जिद्दीने कोरोनावर मात

सध्या कमी लक्षणाचे रुग्ण कोविड केअर सेंटरमध्ये तर तीव्र लक्षणाच्या, ऑक्‍सिजनची (oxygen) गरज असणाऱ्या रुग्णांवर समर्पित कोविड रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या ठिकाणी रुग्णांच्या नातेवाईकांचा थेट वावर सुरू आहे. शिवाय हे नातेवाईक रुग्णालयातून आपल्या घरी जात आहेत. त्यामुळे या नातेवाईकासह घरातील अन्य व्यक्तींनाही संसर्ग होण्याचा धोका निर्माण होत आहे. एकाच घरातील बाधितांची संख्या वाढण्यामागे हे एक कारण असल्याचे मानले जात आहे. प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेऊन नातेवाईकांचा थेट संपर्क कमी कसा होईल, याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

वॉर्ड बॉय वाढवायला हवेत...

कोरोना केअर सेंटरमध्ये वॉर्ड बॉय आहेत. पण, त्यांची संख्या अपुरी आहे. एकच वॉर्डबॉय सर्व रुग्णांच्या नातेवाईकांवर लक्ष ठेवू शकत नाही. समर्पित कोरोना रुग्णालयातील परिस्थितीही अशीच आहे. त्यामुळे गेटवरच दोन वॉर्ड बॉय ठेवायला हवेत. अत्यंतिक गरज असलेले साहित्यच त्यांच्यातर्फे रुग्णाला पोहोच करण्याची व्यवस्था झाली, तर बऱ्याच प्रमाणात या समस्येला अटकाव घालणे शक्‍य होणार आहे.

हेही वाचा: Twitter कडून भारताला 110 कोटींची मदत

या कारणांचा आधार...

  • आमच्या रुग्णाला जेवणाचा डबा द्यायचा आहे

  • जेवण इथे मिळते असे सांगितले तर चपाती चालत नाही, भाकरीच लागते

  • नेहमीची औषधे द्यायची आहेत

  • रुग्ण लहान मुलगा आहे