कोल्हापूर : नाल्यांलगतची बांधकामे काढा; अन्यथा कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kolhapur corporation Meeting

कोल्हापूर : नाल्यांलगतची बांधकामे काढा; अन्यथा कारवाई

कोल्हापूर - नाल्यांच्या परिसरातील अनधिकृत बांधकामे करणाऱ्या ८० मिळकतींधारकांना सोमवारी महापालिकेच्या नगरचना विभागामार्फत नोटीस दिल्या. तसेच पूरक्षेत्रात येणाऱ्या १०९ इमारतींना विविध सुविधा कार्यान्वित करण्याच्याही नोटीस दिल्या. प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी संभाव्य पूरस्थितीचा धोका लक्षात घेऊन कारवाईच्या सूचना सोमवारी सकाळी घेतलेल्या बैठकीत नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक रामचंद्र महाजन यांना दिल्या होत्या. त्याप्रमाणे तातडीने ही कारवाई केली.

राज्य सरकारच्या पाटबंधारे विभागाने ६ डिसेंबर २०१९ रोजी शहरातील पंचगंगा नदीलगत अंतिम निळी, लाल व हिरवी पूररेषा निश्‍चित करून नकाशे प्रसिद्ध केले आहेत. या अनुषंगाने आज सकाळी महापालिकेत मॉन्सून आणि संभाव्य पूरस्थितीसाठी पूर्वतयारी आढावा बैठक झाली. त्यात प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी २०२१ ची पूरस्थिती विचारात घेऊन रहिवास, वाणिज्य प्रकल्पांच्या सुरक्षेसाठी लाईफ जॅकेट, रेस्क्यू बोट, इमर्जन्सी लाईट आदी सुविधा पावसाळ्यापूर्वी कार्यान्वित करण्याचे आदेश दिले.

Web Title: Remove Constructions Near Nallas Otherwise Action Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top