Sadabhau Khot : सदाभाऊंनी राजू शेट्टींच्या विरोधात ठोकला शड्डू! हातकणंगलेच्या उमेदवारीसाठी फडणवीसांना भेटणार

हातकणंगले मतदार संघात प्रस्थापितांना प्राधान्य दिले जात आहे.ही जागा आम्हालाच पाहिजे आम्ही प्रस्थापित नेत्यांचा प्रचार करणार नाही. २०१९ पासून आम्ही ही जागा रयत क्रांती संघटनेला मागत आहे.
Sadabhau Khot
Sadabhau KhotSakal

इस्लामपूर : हातकणंगले मतदार संघात प्रस्थापितांना प्राधान्य दिले जात आहे.ही जागा आम्हालाच पाहिजे आम्ही प्रस्थापित नेत्यांचा प्रचार करणार नाही. २०१९ पासून आम्ही ही जागा रयत क्रांती संघटनेला मागत आहे.

मात्र येथे प्रस्थापितांनाच प्राधान्य दिले जात असल्याने आमच्यासारखे विस्थापित दुर्लक्षीतच रहात आहेत, ही जागा रयत क्रांती संघटना लढवणार आहे.त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची उद्या( गुरुवारी) भेट घेणार असल्याची माहिती माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

ते म्हणाले, सुरवातीपासूनच प्रस्तापितांच्याविरोधात आमची लढाई सुरु आहे. आम्ही नेहमी विस्तापितांच्या बाजूनेच राहिलो आहे. मात्र राजकारणात प्रस्तापित घराणीच आमच्या मानगूटीवर बसत आहेत.

त्यामुळे भविष्यात विस्तापित विरुद्ध प्रस्तापित लढाई अधिक तीव्र करणार आहोत. आम्ही महायुतीकडे हातकणंगलेची जागा रयत क्रांती संघटनेला मिळावी अशी मागणी केली होती. मात्र दुर्देवाने या मागणीचा विचार होताना दिसत नाही.

गेल्या लोकसभा निवडणुकीतही आम्ही निवडणूक लढविण्याची सर्व तयारी केली होती. मात्र जागा वाटपात ही जागा शिवसेनेला गेली. आम्हाला थांबण्याचा सल्ला देण्यात आला. युतीचा धर्म पाळून आम्ही माघार घेतली.

प्रचारप्रमुखाची भुमिका बजावून महायुतीचा उमेदवार निवडून आणला. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली. आम्ही पुन्हा रस्त्यावरची लढाई लढत सामान्य जनतेशी नाळ कायम ठेवली. आता या निवडणुकीत तरी हातकणंगलेची जागा आम्हाला मिळावी अशी मागणी आम्ही महायुतीकडे केली होती.

मात्र पुन्हा आम्हाला डावलण्यात येत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आम्ही आता प्रस्तापितांचा प्रचार करणार करणार नाही. कार्यकर्त्यांची बैठक घेवून पुढील भुमिका निश्चीत करु. तसेच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना भेटून या जागेसंदर्भात चर्चा करु.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com