कागल मधील 'त्या' तरुणाच्या संपर्कातील सर्वांचे अहवाल निगेटीव्ह ; एसटी विभागालाही दिलासा

All the reports of young man's contact in Kagal are corona negative
All the reports of young man's contact in Kagal are corona negative

कागल - येथील यशील पार्कात कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेल्या तरुणाच्या संपर्कातील सर्वजणांचे अहवाल निगेटिव्ह आले. रात्री उशिरा हे सर्व अहवाल प्राप्त झाले. त्यामुळे कागलकरांना दिलासा मिळाला आहे.

येथील यशील पार्कात कोरोना पॉझिटिव्ह आला. तो कोल्हापूर येथे एसटी कार्यालयात नोकरीस होता. तसेच नारळाचा व्यापारी आहे. कागल शहरासह सिध्दनेर्ली नदी किनारा पर्यंत त्याने दुकानदारांना नारळ विक्री केली आहे.

त्याच्या जवळच्या संपर्कात एकूण ९६ व्यक्ती आल्या होत्या. त्यामध्ये एसटी विभागासह व्यापाऱ्यांचा समावेश आहे. यामुळे शहरासह एसटी विभागात खळबळ उडाली. एकूण ६४ लोकांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. उर्वरित ३२ जणांना डॉ. आंबेडकर वसतिगृहामध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे. यापैकी २६ जणांचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील नातेवाईकांसह सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामुळे कागलसह एसटी विभागाला दिलासा मिळाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com