Teacher Killed in Bus Accidentesakal
कोल्हापूर
एसटीच्या चाकाखाली सापडून कर्तव्यनिष्ठ शिक्षक जागीच ठार; देवदर्शनाला जाताना अपघात, मृतदेहाची अवस्था पाहून कुटुंबीयांनी फोडला हंबरडा
Teacher Killed in Bus Accident : सकाळी दर्शनासाठी निघालेले विजयकुमार चौगुले यांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या मृतदेहाची अवस्था पाहून कुटुंबीयांनी हंबरडा फोडला.
इचलकरंजी : रस्त्याच्या मध्यभागी अडकलेली केबल टाळण्याच्या प्रयत्नात मोटारसायकल घसरली आणि बाजूने जाणाऱ्या एसटी बसच्या (ST Bus Accident) मागील चाकात सापडून निवृत्त शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला. विजयकुमार बाळासो चौगुले (वय ६०, यड्राव फाटा, इचलकरंजी) असे मृत शिक्षकाचे नाव आहे. ही घटना काल सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास सांगली नाका ते इचलकरंजी मार्गावर आनंद गेस्ट हाऊससमोर घडली.
