esakal | जोतिबा यात्रेसाठी कडेकोट बंदोबस्त; मंदिराकडे जाणारे सर्व मार्ग बंद

बोलून बातमी शोधा

जोतिबा यात्रेसाठी कडेकोट बंदोबस्त; मंदिराकडे जाणारे सर्व मार्ग बंद
जोतिबा यात्रेसाठी कडेकोट बंदोबस्त; मंदिराकडे जाणारे सर्व मार्ग बंद
sakal_logo
By
राजेश मोरे

कोल्हापूर : श्री क्षेत्र जोतिबाची चैत्र यात्रा उद्या (26) होणार आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याकाळात भाविकांना मंदिरात प्रवेश देण्यात येणार नाही. शासनाच्या निर्देशाची काटेकोर अमंलबाजवणी करण्यासाठी जोतिबा मंदिराकडे जाणाऱ्या सर्व मार्गासह मंदिरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

चैत्र यात्रेसाठी दरवर्षी राज्यासह देशातील विविध भागातून लाखो भाविक येतात. पण कोरोना संकटामुळे गतवर्षही ही यात्रा झाली नव्हती. यंदाही ही यात्रा साधेपणाने व जिल्हा प्रशासनाकडून परवानगी देण्यात आलेल्या ठराविक लोकांच्या उपस्थितीत होणार आहे. यात्रेसाठी भाविकांनी मंदिराकडे येऊ नये यासाठी पोलिस प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे. त्याचबरोबर मंदिर व मंदिराकडे येणाऱ्या गायमुख, पोहाळे असे सर्व मार्ग बेरेकेडस्‌ लावून बंद करण्यात आले आहेत. येथेही शनिवारी रात्री पासून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आले आहे. संचारबंदी असल्याने गावातील लोकांनाही अत्यावश्‍यक कामाशिवाय बाहेर सोडण्यात येणार नाही. हा बंदोबस्त मंगळवार (27) पर्यंत कायम ठेवण्यात येणार आहे.

असा आहे बंदोबस्त :

  • पोलिस उप - अधीक्षक - 1

  • पोलिस निरीक्षक - 4

  • सहायक व उपनिरीक्षक - 10

  • कर्मचारी - 7

  • महिला कर्मचारी - 20

  • होमगार्ड - 20

पोलिसांची कोरोना चाचणी...

कोरोना संसर्गाचा धोका विचारात घेऊन बंदोबस्तासाठी नेमण्यात आलेल्या सर्व पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करूनच त्यांना बंदोबस्तासाठी पाठविण्यात आले आहे.

"चैत्र यात्रेनिमित्त मंदिर व मंदिराकडे जाणाऱ्या सर्व मार्गावर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे."

- आर. आर. पाटील (करवीर पोलिस उप-अधीक्षक)