esakal | 'सारथी' ने स्थानिक रोजगाराला बळ द्यावे : समरजितसिंह घाटगे
sakal

बोलून बातमी शोधा

'सारथी' ने स्थानिक रोजगाराला बळ द्यावे : समरजितसिंह घाटगे

'सारथी' ने स्थानिक रोजगाराला बळ द्यावे : समरजितसिंह घाटगे

sakal_logo
By
टीम ई सकाळ

कोल्हापूर : मराठा तरूणांच्या उत्कर्षासाठी 'सारथी'ने (saarthi) त्या, त्या जिल्ह्यातील स्थानिक रोजगाराला अधिक बळ द्यावे, असे आवाहन शाहू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे (samarjitsing ghatage) यांनी आज व्यक्त केले. राजे विक्रमसिंह घाटगे बॅंकेतील (लक्ष्मीपुरी शाखा) समन्वय कक्षाच्या उद्घाटनानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. (kolhapur district) अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून तरुणांना उद्योग, व्यवसायासाठी मदत केली जाणार आहे.

घाटगे म्हणाले, मराठा तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योगांकडे वळावे, यासाठी सारथी संस्थेच्या मार्फत विविध उपाय योजना व त्यांना मदतीचे उपक्रम राबवले जात आहेत. आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ कडून अर्थसहाय्यही दिले जाते. मात्र अनेक तरुणांसमोर नेमका कोणता उद्योग करावा. याबाबत संभ्रम आहे. त्यासाठी सारथीने कौशल्य विकासातंर्गत त्या त्या जिल्ह्यात नेमक्या कोणत्या उद्योग व्यवसायात टॅंलेट आहे याचा विचार करावा.

हेही वाचा: पंकजा मुंडे नाराजगी व्यक्त करतील पण बंड नाही - पाटील

कोल्हापुरी चप्पल, कोल्हापुरी गूळ, कोल्हापुरी साज अशी वैशिष्ट्ये आहेत. त्यास बॅक क्लस्टरच्या माध्यमातून प्रोत्साहन दिल्यास स्थानिक स्तरावर रोजगार उपल्बध होऊ शकेल. कोल्हापुरातून मॉडेलची सुरवात करून राज्यभर तो राबविल्यास त्याचा निश्‍चितपणे फायदा होईल. यावेळी विनोदकुमार कांबळे, प्रकाश परीट, ओंकार अस्वले, निलेश पगडे यांनी भागभांडवलाच्या माध्यमातून कसे रोजगार उभे केले याची माहिती दिली. यावेळी राजे बँकेचे अध्यक्ष एम. पी. पाटील, उपाध्यक्ष नंदकुमार माळकर, राजेंद्र जाधव, प्रकाश पाटील, चेतन नरके, दिलीप पाटील, अरुण कांबळे आदी उपस्थित होते.

loading image