सागरेश्वरमधील 'त्या' पहिल्या झाडाचा आज सुवर्ण महोत्सव

सागरेश्वरमधील 'त्या' पहिल्या झाडाचा आज सुवर्ण महोत्सव

देवराष्ट्रे (सांगली) : सागरेश्वर अभयारण्य देशातील पहिले मानवनिर्मित अभयारण्य आहे. वृक्षमित्र धों. म. मोहिते यांनी दोन तपे परिश्रम घेतले. अभयारण्य निर्मितीच्या ध्यास घेऊन धों. म. (अण्णा) मोहिते यांनी २१ ऑगस्ट १९७१ ला पहिला वृक्ष लावला. उद्या (ता. २१) त्याला ५० वर्षे होत आहेत. पत्रकार मित्रांबरोबर अण्णा विदर्भ दौऱ्यावर गेले होते. ताडोबाच्या दिशेने जाताना त्यांना सागरेश्वरच्या डोंगरावर अभयारण्य उभारायचा विचार सुचला. निर्णयही झाला. मित्रांना संकल्पना सांगितली. त्यांनी खिल्ली उडवली. त्याक्षणी धों. म. या निसर्गवेड्याने सागरेश्वरवर अभयारण्य उभारण्याचा निर्धार केला.

Summary

सागरेश्वर अभयारण्य देशातील पहिले मानवनिर्मित अभयारण्य आहे.

परतल्यावर पहिल्यांदा अभयारण्यासाठी जागा निश्चित केली. जागा वन विभागाची होती. जंगल तेही राखीव. प्रवास खडतर होता. निर्णय घेतला की माघार नाही असा त्यांचा स्वभाव. काम तडीस लावायचेच हा निर्धार. प्रथम कऱ्हाड येथील रेंज फॉरेस्ट ऑफिसला भेट देऊन अभयारण्य उभारायचेय असे सांगितले. अधिकाऱ्यांनी धुडकावले. पुढे अण्णांच्या वाऱ्या सुरू झाल्या. थांबेचनात. प्रतिसादही मिळेना.

दरम्यानच्या काळात माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची भेट झाली. अभयारण्याबाबत माहिती दिली. वन विभागाचे अभयारण्य न होण्याचे पत्र दाखवले. चव्हाण यांनी मार्ग सांगितला. वन विभागाचे अधिकारी अभयारण्याची जागा पाहणीस धों. म. अण्णांना शोधू लागले. अण्णांनी जागा दाखवली. परवानगीसाठी सागरेश्वरालाही साकडे घातले.हद्द निश्चिती, जागा हस्तांतरात अवधी गेला. कार्यवाहीची वेळ मंत्रालयावर आली. वनविभागाचे पत्र आले, की अभयारण्य होऊ शकत नाही. दुसऱ्या दिवशी अण्णा मुंबईत. मंत्र्यांना भेटले. पण त्यांनी नकार दिला. दिल्लीत यशवंतराव चव्हाण यांना दूरध्वनी करून घाडमोडी सांगितल्या. चव्हाण म्हणाले, ‘तुझे अभयारण्य झाल्याशी कारण’.

सागरेश्वरमधील 'त्या' पहिल्या झाडाचा आज सुवर्ण महोत्सव
कोल्हापुरात नऊ पालिकांत लवकरच बिगुल ;राज्य निवडणूक आयोगाचा आदेश

दुसऱ्या दिवशी मोहिते वसंतदादांकडे गेले. त्यांनी मंत्र्यास दूरध्वनी केला. मोहिते यांना पाठवा, असे तिरपुडे म्हणाले. तिरपुडे व मोहितेंची गट्टी जमली. तीन लाख रुपये मंजूर झाले. तिरपुडेंनी त्यांना सांगितले, दिल्लीशी बोलला का? स्मित हास्य करीत अण्णा म्हणाले, होय. आणि अभयारण्याचा मार्ग मोकळा झाला. झाडे दाखल झाली. वृक्षारोपण रात्रीच करायचे. २१ ऑगस्ट १९७१ रोजी गॅसबत्तीच्या उजेडात, उभ्या पावसात रात्री बारा वाजता कांचन वृक्ष धों. म. अण्णा यांच्या हस्ते लावला. निसर्ग वेड्या माणसाच्या जिद्दीने देशातील पहिले मानवनिर्मित अभयारण्य आकारास येऊन लागले. या कामाची दखल घेत इंदिरा प्रियदर्शनी वृक्षमित्र पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आला होता.

आज वृक्षारोपण

यशवंतराव चव्हाण व्यवस्थापन समितीने वृक्षचळवळ सुरू केली आहे. धों. म. मोहिते यांनी लावलेल्या झाडास ५० वर्षे होत आहेत. त्यानिमित्त अभयारण्यात समितीतर्फे उद्या (ता. २१) वृक्षारोपण करण्यात येणार आहे, असे ग्रामपंचायत सदस्य प्रमोद महिंद यांनी सांगितले.

देवराष्ट्रे येथील यशवंतराव चव्हाण व्यवस्थान समितीने वृक्ष चळवळ सुरू केली आहे. धो. म. मोहिते यांनी लावलेल्या रोपास ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त सागरेश्वर अभयारण्यात यशवंतराव चव्हाण व्यवस्थान समिती वृक्षारोप करणार आहे.

- प्रमोद महिंद, ग्रामपंचायत सदस्य, देवराष्ट्रे

सागरेश्वर अभयारण्यात पर्यटन वाढीसाठी प्रयत्न करणार आहे. दिवंगत माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी अभयारण्यात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली. नव्या कायांसाठी सरकारकडे पाठपुरावा करणार आहोत.

-रोहित मोहिते, धों. म. मोहिते यांचे नातू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com