महाराष्ट्र ही सहकार पंढरी म्हणून ओळखली जाते. देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राला सहकाराची मोठी परंपरा आहे.
कोल्हापूर : गेल्या वीस वर्षांत राज्यातील तब्बल ४४ सहकारी तत्त्वावरील साखर कारखान्यांची (Sugar Factories) थेट विक्री झाली आहे. अतिशय मातीमोल किमतीत हे कारखाने विकले असून, नऊ सहकारी साखर कारखाने भाडे तत्त्वावर चालीवण्यास दिले आहेत.