शेतकर्‍यांना मदत मिळवून देणे हीच माझी दिवाळी ;  समरजितसिंह घाटगे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

samarjeet ghatge discussion to farmers in kolhapur

आज सर्वत्र दिवाळी सण साजरा केला जात असताना समरजितसिंह घाटगे यांनी कोळवण सारख्या  ग्रामीण भागातील शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांची संवाद साधला.

शेतकर्‍यांना मदत मिळवून देणे हीच माझी दिवाळी ;  समरजितसिंह घाटगे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोनवडे : शेतकर्‍यांना शासनाकडून त्यांच्या हक्काची मदत मिळवून देणे हीच खरी माझी दिवाळी आहे, असे प्रतिपादन शाहू साखर कारखान्याचे चेअरमन व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.

कोळवण (ता. भुदरगड) येथे राजर्षि  छत्रपती शाहू महाराज यांच्या जनक घराण्याची जनपंचायत शिवार संवाद कार्यक्रम वेळी शेतकर्‍यांचा संवाद साधताना ते बोलत होते.

दिवाळी सणाची सुरूवात शेतकऱ्यांच्या वतीने साज-या केल्या जाणाऱ्या  वसुबरसने दारवाड येथे गोमाता व वासराच्या पुजनाने  छत्रपती शाहू महाराज यांच्या जनक घराण्याची जनपंचायत शिवार संवाद कार्यक्रमाचा प्रारंम केला. 

कोळवण (ता. भुदरगड) येथील गुरवकी नावाच्या शिवारात झालेल्या शिवार संवाद कार्यक्रमासाठी ते शेताच्या बांधावरुन अंदाजे किलोमीटर इतके अंतर शेतकऱ्यांसह चालत गेले. तिथे चालत जात असताना भात वाळवणी सुरू असलेल्या  शेतकऱ्यांसोबत सुप हातात घेऊन भाताला वारे दिले.  कोणत्याही परिस्थितीत आपण शेतक-यांसोबत असल्याचा संदेश त्यांनी यावेळी दिला. यावेळी शेतकऱ्यांनी त्यांना अतिवृष्टीने नुकसान होऊन सडलेल्या भुईमुगाच्या शेंगा व विळा भेट देऊन शासन दरबारी मदतीबाबात आवाज उठवावा, असे साकडे घातले.

ते पुढे म्हणाले, शासनाने जाहीर करूनही न मिळालेले प्रोत्साहनात्मक अनुदान, अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलेली तोकडी मदत, अन्यायी वीज दरवाढ यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आला आहे. त्यांनी दिवाळी साजरी कशी करायची? शेतकऱ्यांच्या या परिस्थितीमुळे मी अस्वस्थ होऊन शेतकऱ्यांच्या बांधावर समस्या जाणून घेण्यासाठी पोहोचत आहे. 

यावेळी  बाबासाहेब पाटील, राहुल देसाई, भगवानराव काटे, प्रवीणसिंह सावंत, दत्तामामा खराडे, आक्काताई नलवडे यांनीही मनोगत व्यक्त केले. स्वागत विनायक परूळकर यांनी केले. प्रास्ताविक अनिल तळकर यांनी केले. 

दिवाळीत राजा बांधावर आणि व्यथा शेतकऱ्यांच्या ओठावर

आज सर्वत्र दिवाळी सण साजरा केला जात असताना समरजितसिंह घाटगे यांनी कोळवण सारख्या  ग्रामीण भागातील शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांची संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्या सोडविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचे वचन दिले. दिवाळी सणाच्या निमित्ताने राजा बांधावर आणि शेतकऱ्यांच्या व्यथा ओठावर अशी अवस्था या दौऱ्याच्या निमित्ताने पहावयास मिळाली.

हे पण वाचा - फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारताना राहा दक्ष ; विवस्त्र फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी

चर्चा राजेंच्या साधेपणाची

या शिवार संवाद दौऱ्यासाठी राजे बांधावरून अंदाजे एक किलोमीटर शेतकऱ्यांसोबत चालत संवाद दौऱ्याच्या स्थळी गेले. तिथे गोणपाटाच्या तरटीवर त्यांनी शेतकऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसून शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांच्या व्यथा समजावून घेतल्या. शेतकऱ्यांनी या ठिकाणी आणलेली भाजी भाकरी त्यांच्या सोबत बसून खाल्ली. याशिवाय या कार्यक्रम स्थळाच्या बाजूला  एका शेतकऱ्याच्या विवाह स्थळी जाऊन नववधूवरांना शुभेच्छा दिल्या.  

संपादन - धनाजी सुर्वे 

loading image
go to top