
Sambhaji Bhide Controversial Statement: शिवरायांच्या इतिहासाला आणि त्यांच्या स्मृतींना महाराष्ट्रात नेहमीच विशेष स्थान आहे. मात्र, संभाजी भिडे गुरुजी यांनी नुकतेच केलेले एक वक्तव्य सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. त्यांनी 6 जून रोजी साजरा होणारा शिवराज्याभिषेक सोहळा कायमस्वरूपी बरखास्त करण्याची मागणी केली आहे. यासोबतच रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्याबाबतही त्यांनी मत व्यक्त केले आहे, ज्यामुळे नवीन वादाला तोंड फुटले आहे.