esakal | संभाजीराजेंचा राज्यभर दौरा; मराठा आरक्षणाची पुढची दिशा ठरवणार
sakal

बोलून बातमी शोधा

संभाजीराजेंचा राज्यभर दौरा; मराठा आरक्षणाची पुढची दिशा ठरवणार

संभाजीराजेंचा राज्यभर दौरा; मराठा आरक्षणाची पुढची दिशा ठरवणार

sakal_logo
By
टीम ई सकाळ

कोल्हापूर : मराठा समाजाला आरक्षण (maratha reservation) मिळवून देण्यासाठी समाजातील कायदे तज्ज्ञ, अभ्यासक यांच्याशी चर्चा करण्यासाठी महाराष्ट्राचा दौरा (maharashtra) करणार असल्याची माहिती खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती (sambhajiraje chhatrapati) यांनी आज येथे दिली. छत्रपती शाहू महाराज यांच्या नर्सरी बागेतील समाधी स्थळास त्यांनी आज अभिवादन केले. यावेळी बारा बलुतेदारांच्या प्रतिनिधींनी मराठा आरक्षणास पाठिंबा दिला.

सर्वोच्च न्यायालयाने (suprime court) मराठा समाजाचे आरक्षण रद्द केल्यानंतर समाजात अस्वस्थतेची भावना आहे. या पार्श्वभूमीवर संभाजीराजे कोणती भूमिका घेणार याकडे समाजाचे लक्ष लागले आहे. संभाजीराजे येत्या २७ मेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM uddhav thackrey) व विरोधी पक्षांशी चर्चा करून मराठा आरक्षणा संबंधीची भूमिका मांडणार आहेत. तत्पूर्वी त्यांनी आज राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्थळास अभिवादन केले. यावेळी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय,' 'राजर्षी छत्रपती शाहू महाराज की जय,' 'मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे,' अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. संयुक्त जुना बुधवार तालमीने संभाजीराजे यांच्या भूमिकेस पाठिंबा देणारे निवेदन दिले.

हेही वाचा: निरोगी व्यक्तींनाही कोरोनाचा धोका; दुसऱ्या लाटेत 50 जणांचा मृत्यू

संभाजीराजे म्हणाले, 'राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी १९०२ ला मराठा समाजासह सर्व अनुसूचित जाती-जमाती, इतर मागास वर्गीय समाजाला आरक्षण दिले होते. मात्र, आज मराठा समाजाला आरक्षण नसल्याने समाजाची हलाखीची स्थिती आहे. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केल्याने समाजात नाराजी पसरली आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा दौरा करून कायदे तज्ञ व अभ्यासकांशी चर्चा करणार आहे.'

ते म्हणाले, 'राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची कोल्हापूर नगरी ही पुरोगामी विचारांची आहे. त्याची प्रचिती आज आली आहे. बारा बलुतेदारांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा देऊन राजर्षी शाहू महाराजांवरील कृतज्ञता व्यक्त केली आहे. शाहू राजांच्या घराण्याचा वारसदार म्हणून मला बहुजन समाजाचे कौतुक आहे.'

हेही वाचा: Yaas चक्रीवादळ पुढच्या 24 तासात बंगालला धडकणार

loading image