
कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी (maratha reservation) मराठा समाजाने रस्त्यावर उतरून ताकद दाखवली आहे. आता कोरोनाच्या महामारीत पुन्हा समाजाला रस्त्यावर आणायची ही वेळ आहे का, असा प्रश्न उपस्थित करत राज्य सरकारच्या (state governement) हातातील मागण्या मान्य करून मराठा समाजाला आधार देऊया, असा आश्वासक सूर खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती (sambhajiraje) यांनी आज येथे व्यक्त केला. सकल मराठा समाजातर्फे संभाजीराजे यांनी शासनाशी चर्चा करून मागण्या मान्य केल्याबद्दल भवानी मंडप येथे आज स्वागत करण्यात आले. (kolhapur) त्यावेळी ते बोलत होते. त्यांनी मूक आंदोलनानंतर शासनासमवेत झालेली बैठक, मान्य झालेल्या मागण्या व मूक आंदोलनामागील भूमिका मांडली.
संभाजीराजे म्हणाले, "बहुजन समाजाची स्थिती जाणून घेण्यासाठी २००६ पासून मी महाराष्ट्राचा दौरा सुरु केला. विशेषतः मराठवाड्यातील जातीय विषमता पाहायला मिळाली. बहुजन समाजाला न्याय देण्याची भूमिका स्वीकारून माझा लढा सुरू झाला. मराठा आरक्षण मिळवण्यासाठी समाजाला एकत्रित करण्याचा प्रयत्न झाला. सर्वोच्च न्यायालयाने (supreme court) मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर त्यावरील पर्यायांवर कोणी बोलले नाही." ठोक मोर्चा काढण्याचा लोकशाहीत सर्वांना अधिकार आहे. मी लोकशाहीचा पाईक आहे. छत्रपती घराण्याचे माझ्यावर संस्कार आहेत. कोणी आंदोलन केले म्हणून बघून घेण्याची माझी भाषा असणार नाही, असे संभाजीराजे यांनी स्पष्ट केले.
ओबीसीतून आरक्षण (OBC reservation) द्या, ही मुख्य मागणी होऊ शकत नाही. वंचितांना आरक्षण द्या, ही मागणी मी करू शकतो. मूक आंदोलनानंतर पालकमंत्री व ग्रामविकास मंत्री यांनी मुख्यमंत्री यांच्यासमवेत बैठकीसाठी जाण्याचा आग्रह केला. बैठकीतून समाजाच्या मागण्या होत असतील तर मी मॅनेज झालोय का? माझ्यावर छत्रपती घराण्याचे संस्कार आहे हे का विसरता, असा प्रश्न संभाजीराजे यांनी उपस्थित केला.
संभाजीराजे म्हणाले...
सारथीसाठी दीड तास चर्चा
मराठा समाजाला ओबीसींप्रमाणे सवलत देण्याची मागणी
सारथीला हजार कोटी रुपये देण्याची मागणी
२१८५ नियुक्त्यांबाबत लवकरच निर्णय
कोपार्डी प्रकरणी स्पेशल बेंच स्थापन करण्याची मागणी
मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या ४२ जणांच्या कुटुंबियांना नोकरी देण्याची मागणी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.