esakal | सांगली: पंचेचाळीस वर्षावरील २५ टक्के लोकांना हवी आहे कोरोना लस
sakal

बोलून बातमी शोधा

corona vaccination

सांगली: पंचेचाळीस वर्षावरील २५ टक्के लोकांना हवी आहे कोरोना लस

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगली: कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूभीवर जिल्ह्यात लसीकरण मोहिम गतीने राबवण्याची गरज आहे. प्रशासनाचे प्रयत्न सुरु आहेत. ४५ वयावरील २५ टक्के लोक अजूनही पहिल्या डोसपासून वंचित आहेत. त्यांना प्राधान्याने लस देणे गरजेचे आहे. सध्या पहिली ते बारावीचे वर्ग सुरु झालेत. दिवाळीनंतर पदवी सुरु होईल. १८ वर्षापुढील वयोगटाच्या तरूणांना लसीकरण गतीने करण्याची गरज आहे. जिल्ह्यात ५७ टक्के लसीकरण झाले आहे. ते शिराळा तालुक्यात सर्वाधिक ७३, तर जत तालुक्यात अवघे ४० टक्के आहे.

हेही वाचा: कोल्हापुरात राजघराण्याच्या गणेशाचे शाही लवाजम्यासह आगमन

केरळमध्ये तिसरी लाट सुरू झाल्याचे सांगितले जाते. महाराष्ट्रातही मुंबई, नागपूरला तिसऱ्या लाटेचा शिरकाव झाल्याचे लोकप्रतिनिधींनी जाहिर केले आहे. बचावासाठी लसीकरण हाच एकमेव पर्याय सध्या तरी दिसत आहे. सप्टेंबरमध्ये जिल्ह्यासाठी आठ लाख डोस मिळणार आहेत. कोरोनाच्या अटकावासाठी लसीकरण गतीने राबवण्यात येत आहे.

१८ लाख ६१ हजार नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस मिळाला. सध्या जिल्ह्यात १३ लाख २२ हजार ३४६ नागरिकांना पहिला तर पाच लाख ३९ हजार २०० नागरिकांनी दोन डोस मिळालेत. जिल्ह्यात ५७ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. जत तालुक्यात सर्वात कमी ४० टक्केच लसीकरण झाले असून तेथून प्रतिसाद कमी आहे. जतमधील प्रत्येक गावात जाऊन लसीकरणासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरु झालेत. १८ वर्षावरील नागरिकांच्या शंभर टक्के लसीकरणाची गरज आहे.

दृष्टीक्षेपात लसीकरण

आटपाडी- ६०, जत-४०, कडेगाव-६१, कवठेमहांकाळ-६०, खानापूर- ५०, मिरज- ५७, पलूस- ५७, शिराळा- ७३, तासगाव- ६०, वाळवा- ६३.

loading image
go to top