Sangali Crime : सांगलीत १६ द्राक्ष शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक; पैसे घेऊन दलाल फरार

गेल्या वर्षी मणेराजुरीतील शेतकऱ्यांना दोन कोटी रुपयांचा गंडा द्राक्ष व्यापाऱ्यांनी घातला होता. यंदा द्राक्ष व्यापाऱ्यांकडून फसवणुकीची ही पहिलीच घटना समोर आली आहे.
 sangli grapes traders
sangli grapes traders sakal
Updated on

तासगाव- मणेराजुरी व परिसरातील १६ द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची झारखंड येथील दोन व्यापाऱ्यांनी ३६ लाखांची फसवणूक केल्याची घटना आज उघडकीस आली. दरम्यान, हा दलाल पळून गेल्याचे स्पष्ट झाले आहे. सुरू असलेल्या द्राक्ष हंगामातील फसवणुकीचा ही पहिली घटना आहे. दरम्यान, पोलिसांत कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही.

मणेराजुरी परिसरात द्राक्ष हंगाम सुरू झाला असून देशभरातून व्यापारी तालुक्यात आलेले आहेत. झारखंड येथील पप्पू व रिझवान मलिक हे दोघे काही दिवसांपासून मणेराजुरी परिसरातून तासगाव येथील एका मध्यस्थाच्या माध्यमातून द्राक्ष खरेदी करत आहेत. हे दोघे आरवडे (ता. तासगाव) येथे खोली घेऊन भाड्याने राहत होते.

मात्र ते आज सकाळी त्यांच्याकडे गेलेल्या शेतकऱ्यांना दोघे गायब झाल्याचे लक्षात आल्याने एकच खळबळ उडाली. ज्यांनी या व्यापाऱ्यांना द्राक्ष दिलेली होती, त्यांनी शोधाशोध सुरू केली, भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.

मात्र फोनही बंद येत असल्याने शेतकऱ्यांनी त्या मध्यस्थाला घेऊन तासगाव पोलिस ठाण्याकडे धाव घेतली. उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात शेतकरी थांबून होते. या शेतकऱ्यांकडे स्थानिक मध्यस्थाचे नाव व व्यापाऱ्याचा फोन नंबर याशिवाय काहीही नाही.

काही दिवस या व्यापाऱ्यांनी रोखीने द्राक्ष खरेदी करून विश्वास संपादन केला. सुरवातीचे पैसे रोख दिले. मात्र गेल्या तीन-चार दिवसांपासून खरेदी केलेल्या द्राक्षांचे पैसे आज उद्या देतो, असे म्हणत या व्यापाऱ्यांनी पोबारा केला.

मणेराजुरी येथील १६ द्राक्ष शेतकऱ्यांची ३६ लाख २१ हजार २९२ रुपयांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये १२ हजारांपासून ४ लाखांपर्यंत फसवणूक झालेले शेतकरी आहेत.

रकमेचा आकडा वाढण्याची शक्यता

तालुक्यातील अन्य काही शेतकऱ्यांची फसवणूक झाली असण्याची शक्यता वर्तवली जात असून फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी मणेराजुरीतील शेतकऱ्यांना दोन कोटी रुपयांचा गंडा द्राक्ष व्यापाऱ्यांनी घातला होता. यंदा द्राक्ष व्यापाऱ्यांकडून फसवणुकीची ही पहिलीच घटना समोर आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

impact of Middle East crisis on Indian grape export
Mango Trader End Life ratnagiri news
Kolhapur suspicious death silver business dispute
High Profit Lure Costs Trader Dear; Four Accused in Ahilyanagar Case
Marathi News Esakal
www.esakal.com