शिरोली पुलाची : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या (Pune-Bangalore National Highway) सहापदरीकरणाच्या कामादरम्यान ठेकेदार कंपनीने सांगली फाट्यावर ड्रेनेज लाईन बुजवली. परिणामी, पावसाचे पाणी सेवा मार्गावरच साचले असून संपूर्ण सांगली फाटा (Sangli Phata) जलमय झाला आहे. या पाण्यातून संथगतीने वाहतूक सुरू असून, वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. यामुळे वाहनचालक व नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.