'राजाराम'च्या संचालकाला बेदम मारहाण; पाटील-महाडिक वाद पोहोचला मुद्द्यावरून गुद्द्यावर, राजकीय परंपरेला गालबोट

‘राजाराम’चे कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस (Prakash Chitnis) यांना झालेल्या माराहाणीने यात तणाव निर्माण झाला.
Satej Patil-Mahadevrao Mahadik Dispute
Satej Patil-Mahadevrao Mahadik Disputeesakal
Updated on
Summary

पाटील-महाडिक यांच्यातील संघर्षाला २००७ ला सुरुवात झाली. त्यानंतर लगेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार सतेज पाटील विरुद्ध खासदार धनंजय महाडिक यांच्यातील लढतीने या दोघांतील कडवा संघर्ष, ईर्ष्या आणि चुरस पहायला मिळाली.

कोल्हापूर : गेली 16 वर्षे निवडणूक, त्यातील राजकीय आरोप-प्रत्यारोप, एकमेकांवर टीका टिप्पणी, आव्हानांची भाषा इथंपर्यंत मर्यादित असलेला माजी आमदार महादेवराव महाडिक (Mahadevrao Mahadik) विरुद्ध आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांच्यातील वाद आज मुद्द्यावरून गुद्द्यावर पोहोचल्याचे स्पष्ट झाले.

‘राजाराम’चे कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस (Prakash Chitnis) यांना झालेल्या माराहाणीने यात तणाव निर्माण झाला. परिणामी कोल्हापूरच्या राजकीय परंपरेलाही गालबोट लागले. जिल्ह्याला राजकीय नेत्यांतील वाद नवा नाही. यापूर्वी काँग्रेस हा एकच पक्ष असतानाही पक्षांतर्गत नेत्यांतील वादाने टोक गाठले होते; पण तो वाद पेल्यातील वादळ ठरत गेला.

Satej Patil-Mahadevrao Mahadik Dispute
Satej Patil: सतेज पाटील-महाडिक वाद पुन्हा उफाळला! राजाराम साखर कारखान्याच्या संचालकाला बेदम मारहाण

कागलमधील दिवंगत सदाशिवराव मंडलिक - विक्रमसिंह घाटगे यांच्यातील जुना वाद असो किंवा अलीकडच्या पिढीतील हसन मुश्रीफ विरुद्ध दिवंगत मंडलिक वादानेही एवढे टोक गाठले नव्हते. मंडलिक - मुश्रीफ वादात काही गावांत कार्यकर्त्यांत जुंपली पण एकमेकांच्या संस्थातील कर्मचाऱ्यांवर कधी हल्ला झाला नव्हता. हातकणंगले मतदारसंघातील दिवंगत बाळासाहेब माने विरुद्ध रत्नाप्ना कुंभार असो किंवा शाहूवाडी-पन्हाळा तालुक्यातील डॉ. विनय कोरे विरुद्ध दिवंगत यशवंत एकनाथ पाटील यांच्यात टोकाचा संघर्ष असूनही तो ठराविक मर्यादेच्या पुढे गेला नाही.

Satej Patil-Mahadevrao Mahadik Dispute
Loksabha Election : मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी 'अब की बार 400 पार' घोषणेसह भाजप उतरणार निवडणूक रिंगणात!

पाटील-महाडिक यांच्यातील संघर्षाला २००७ ला सुरुवात झाली. त्यानंतर लगेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार सतेज पाटील विरुद्ध खासदार धनंजय महाडिक यांच्यातील लढतीने या दोघांतील कडवा संघर्ष, ईर्ष्या आणि चुरस पहायला मिळाली. त्यातून एक तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, पण माराहाणीपर्यंत हा वाद कधी पुढे गेला नाही. गेल्या १६ वर्षात २०१४ ची लोकसभा निवडणूक वगळता हे दोन नेते एकमेकांच्या विरोधात ताकदीने लढले. कधी महाडिकांना तर कधी श्री. पाटील यांना जय-पराजय सहन करावा लागला. पण त्यानंतर कधी असा प्रकार घडला नव्हता. या वादावादीतून भविष्यात या दोघांत काय होणार याची झलक आजच्या प्रकाराने पाहायला मिळाली.

राजकीय वाद आहे ते दोन्हीही नेते दिग्गज आहेत. आपआपल्या कार्यक्षेत्रावर त्यांचे प्रभुत्त्व आहे. मतदारसंघातील भागावर त्यांची पकड आहे. पण त्यातून निर्माण झालेली ईषर्या वाईट आहे. याची जाण या दोन नेत्यांना यायला पाहीजे. या दोन नेत्यांच्या वादात एखाद्या सामान्य कार्यकर्त्यांचा बळी जाणार नाही ना याचीही दक्षता या दोन नेत्यांनी घेण्याची गरज आहे. सुरूवातीच्या काळात राजकीय स्वरूपाच्या असलेल्या या वादाने आता वैयक्तिक पातळी गाठली आहे. हा सर्वात मोठा धोका दोन्ही नेत्यांना आहे. याचाही विचार भविष्यातील राजकारणात होण्याची गरज आहे.

Satej Patil-Mahadevrao Mahadik Dispute
Hit and Run Law, Truck Drivers Strike : संपामुळं राज्यात 15 लाख ट्रकची चाकं थांबली; तब्बल 500 कोटींचं नुकसान

अध्यक्षपदाचे निमित्त

जिल्हा परिषदेत अमल महाडिक हे काँग्रेसच्या चिन्हावर विजयी झाले होते. त्याच दरम्यान महाडिक-पाटील वादाला सुरुवात झाली होती. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी श्री. महाडिक यांचे नाव आल्यानंतर श्री. पाटील यांनी त्याला विरोध दर्शवला. हेच या दोघांतील वादाला सुरुवात होण्याचे कारण ठरले. त्यानंतरचा इतिहास सर्वज्ञात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com