esakal | कोल्हापूर - दुसरा डोस घेतलेल्या 8 ते 16 हजार जणांना कोरोना 
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापूर - दुसरा डोस घेतलेल्या 8 ते 16 हजार जणांना कोरोना 

कोल्हापूर - दुसरा डोस घेतलेल्या 8 ते 16 हजार जणांना कोरोना 

sakal_logo
By
सुनील पाटील

कोल्हापूर : जिल्ह्यात (kolhapur district) कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेवून 8 ते 16 हजार लोकांना पुन्हा कोरोना झाला आहे. अशा लोकांची माहिती घ्यावी, त्यांची सर्व तपासणी करावी. याशिवाय, कोरोनाचे जुनुकीय बदलली आहेत का? याचेही परिक्षण करावे, अशा सूचना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांनी जिल्हाप्रशासन, सीपीआर, महापालिका आयुक्त व जिल्हा परिषदेला आज दिले. टोपे आज कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. 

यावेळी टोपे म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यात 10 लाख 18 हजार 301 जणांना कोरोना प्रतिबंधक (covid 19 vaccination) पहिला डोस दिला आहे. तर 4 लाख 38 हजार 542 व्यक्तींना दुसरा डोस दिला आहे. दुसरा डोस दिलेल्या 2 ते 4 टक्के लोक कोरोना बाधित झाले आहे. जिल्ह्यात दुसरा डोस घेणारे सुमारे 8 ते 16 हजार लोक कोरोना (covid -19) बाधित झाले आहेत. त्यामुळे कोरोना विषाणूचे जुनूकीय बदलले आहे का? यासाठी जिल्हा प्रशासन, सीपीआर, जिल्हा परिषद व महापालिकेने अशा रुग्णांचा शोध घैतला पाहिजे. त्यांची माहिती घेवून त्यांच्या सर्व नातेवाईकांशी चर्चा करावी. दरम्यान, दुसरा डोस घेवून कोरोना झालेल्या महिला, पुरूषांची आकडवारी घ्यावी व प्रत्यक्ष त्यांच्याशीही चर्चा करावी अशा सूचना राजेश टोपे यांनी दिल्या.

हेही वाचा: दुधगंगा प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावा : हसन मुश्रीफ

loading image