Sangli News : संवेदनशील, कायम व्यस्त मिरज शहर पोलिस

जिल्ह्यात संवेदनशील ठाणे : मनुष्यबळ पुरेसे; पण सण-उत्सवांचा ताण अधिक, सलोख्याची जबाबदारी
sangli
sanglisakal
Updated on

मिरज : जिल्ह्यातील संवेदनशील आणि दाट लोक वस्तीच्या मिरज शहरात देशभरातील संवेदनशील घटनांचे कायम पडसाद उमटण्याचे प्रमाण अधिक असल्यामुळे शहर पोलिसांना कायम सतर्क राहावे लागते. यामुळे शहराच्या मध्यभागी उभारलेले मिरज शहर पोलिस ठाणे कायम व्यस्त पोलिस ठाणे म्हणून परिचित आहे.

या पोलिस ठाण्यात कर्मचाऱ्यांची संख्याबळ लोकसंख्येच्या प्रमाणात पुरेसे आहे. मात्र, येथे वर्षभरात अनेक उत्सव, उरूस, जुलूस, संगीत सभा आणि राजकीय सभांचा अतिरिक्त ताण पोलिसांवर असतो. याकामी बहुतांश पोलिस कर्मचारी बंदोबस्तामध्ये व्यस्त असतात. २००९ च्या घटनेनंतर जिल्ह्यात हे पोलिस ठाणे संवेदनशील म्हणून ओळखले जाते. यामुळे पोलिसांकडून रूट मार्च, कोबिंग ऑपरेशन, वेळोवेळी नाकाबंदी केली, यामुळे गुन्हेगारी आटोक्यात आहे. तसेच या पोलिस ठाण्याला मुख्य शहरासह कृष्णाघाट रोड, वड्डी, बेडग, सुभाषनगर, टाकळी, बोलवाड, कळंबी या सात गावांकडे जाणाऱ्या रस्त्यांपर्यंतचे कार्यक्षेत्र आहे.

sangli
Sangli News : कृष्णा प्रदूषणावर ‘अहवाल पे अहवाल’

मिरज पोलिस ठाण्याचे महात्मा गांधी पोलिस ठाणे आणि मिरज शहर पोलिस ठाणे अशा स्वतंत्र विभाजनानंतर शहर पोलिसांचा अतिरिक्त कमी झाला आहे. वर्षभरात सरासरी ३०० गुन्ह्यांची येथे नोंद आहे. यामध्ये चालू वर्षात खुनासारख्या एक दोन घटना घडल्या आहेत; तर खुनाच्या प्रयत्नांच्या ३ घटनांची पोलिस दप्तरी नोंद आहे. वर्षभरात सावकारीचे २ गुन्हे येथे दाखल आहेत.

मिरज पोलिस ठाण्याचे महात्मा गांधी पोलिस ठाणे आणि मिरज शहर पोलिस ठाणे अशा स्वतंत्र विभाजनानंतर शहर पोलिसांचा अतिरिक्त कमी झाला आहे. वर्षभरात सरासरी ३०० गुन्ह्यांची येथे नोंद आहे. यामध्ये चालू वर्षात खुनासारख्या एक दोन घटना घडल्या आहेत; तर खुनाच्या प्रयत्नांच्या ३ घटनांची पोलिस दप्तरी नोंद आहे. वर्षभरात सावकारीचे २ गुन्हे येथे दाखल आहेत.

वास्तविक गुन्हेगारीचे प्रमाण आटोक्यात ठेवण्यात मिरज शहर पोलिसांनी यश आले आहे. मनुष्य बळाचा आढावा घेतल्यास १ वरिष्ठ पोलिस निरीक्षक, २ सहाय्यक पोलिस निरीक्षक, ४ उपनिरीक्षक, ९ सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक तर १५ महिला कर्मचारी आणि १२ प्रतिनियुक्तीवर इतर पुरुष कर्मचारी अशा एकूण १०० कर्मचाऱ्यांची संख्या आहे.

sangli
Sangli Crime : पेन्शन योजनेच्या बहाण्याने दुचाकीस्वाराने महिलेला लुटले

मिरज शहर पोलिस ठाण्याला वर्षभर सण, उत्सव, सभांसाठी बंदोबस्त पुरवावा लागतो. यामध्ये शहरातील भव्य दिव्य गणेश विसर्जन मिरवणूक, मिरजेचा उरूस, अंबाबाई नवरात्र महोत्सव, दुर्गामाता प्रतिष्ठापणा, शिवप्रतिष्ठाण दौड, मोहरम, बकरी ईद, किसान चौकातील राजकीय सभा या उत्सव, सण, सांस्कृतिक कार्यक्रम, राजकीय सभा यांचा ताण आहे.शिवाय प्रांत कार्यालय, तहसील कार्यालय, शासकीय बांधकाम विभाग येथे अनेक आंदोलने होत असतात. अशा व्यस्त शहरात गेल्या दोन वर्षांत गुन्हेगारीचा आलेख कमी झाला आहे.

मिरज शहरात कायदा सुव्यवस्थेसाठी कायम दक्ष राहावे लागते. धार्मिक सलोख्यासाठी प्रयत्न केले जातात. तर शांतता कमिटी सोबत बैठका घेऊन शांततेचे आव्हान केले जाते. शहराच्या प्रमाणात बहुतांश कर्मचारी संख्या उपलब्ध आहे. चालू स्थितीला दुचाकी चोरट्यांचे आव्हान आहे. लवकरच या चोट्यांवर अंकुश ठेवू.

- संजीव झाडे,

वरिष्ठ पोलिस निरीक्षक मिरज शहर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com