जन्मदात्यानेच घोटला 'त्या' बालकाचा गळा: रायबाग परीसरात हळहळ

जन्मदात्यानेच घोटला 'त्या' बालकाचा गळा: रायबाग परीसरात हळहळ

रायबाग : कर्नाटकातील रायबाग तालुक्यातील आलखनूर येथे कूपनलिकेत पडून मृत्यू झालेल्या बालकाचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. आपणच गळा आवळून मुलाचा मृतदेह कूपनलिकेत कोंबल्याची कबुली वडिलाने पोलिसांसमोर दिली. त्याने निर्दयीपणे हे कृत्य केल्याने हळहळ व्यक्त होत आहे. शरद सिद्धाप्पा हसरे (वय २) असे मयत मुलाचे तर सिद्धाप्पा बसाप्पा हसरे (वय २३) असे अटक केलेल्या वडिलाचे नाव आहे. हारुगेरी पोलिसात घटनेची शनिवारी (ता. १८) रात्री उशीरा नोंद झाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी,

सिद्धाप्पा व पत्नी राजश्री यांच्यात वारंवार भांडणे होत. त्याचा पत्नीवर चारित्र्यावरुन संशय होता. शरद हा आपला मुलगा नसल्याचा संशय त्याला होता. घरात कोणी नसल्याचे पाहून शुक्रवारी त्याने शरदला शेतात नेले. गळा आवळून खून केला. त्यानंतर मृतदेह कूपनलिकेत कोंबला. त्याबाबत शुक्रवारी बेपत्ता झाल्याची फिर्याद शुक्रवारी पोलिसात करण्यात आली होती.

शनिवारी मृतदेह आढळल्याने व घटनास्थळ घरापासून शेतात लांबवर असल्याने खून करून टाकल्याचा संशय व्यक्त होत होता. त्यादृष्टीने तपासाची चक्रे पोलिसांनी फिरविली. सिद्धाप्पाकडे अधिक तपासणी केल्यावर त्याने कबुली दिली. आरोपी सिद्धाप्पाला अटक करून न्यायालयात हजर केल्यावर कारागृहात रवानगी करण्यात आली. घटनेची फिर्याद राजश्रीची आई सरस्वती अक्कीमरडी (रा. आलखनूर) हिने दिली आहे.अथणीचे पोलिस उपाधिक्षक एस. व्ही. गिरीश, मंडल पोलिस निरीक्षक के. एस. हट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली हारुगेरी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक राघवेंद्र खोत व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com