kolhapur | शौमिका महाडिक यांचे नांव निश्‍चित आज घोषणा शक्य; चंद्रकांत पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चंद्रकांत पाटील

शौमिका महाडिक यांचे नांव निश्‍चित आज घोषणा शक्य; चंद्रकांत पाटील

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षांकडून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष व माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या स्नूषा सौ. शौमिका महाडिक यांचे नांव निश्‍चित झाले आहे. उद्या (ता. १३) पत्रकार परिषद घेऊन या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी शिरोली येथे माजी आमदार महादेवराव महाडिक यांची भेट घेतली. या भेटीनंतरच सौ. महाडिक यांच्या नावांवर शिक्कामोर्तब झाले. यावेळी माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक उपस्थित होते.

महाविकास आघाडीकडून विद्यमान आमदार व पालकमंत्री सतेज पाटील यांचे नांव निश्‍चित आहे. त्यांच्या विरोधात भाजपचा उमेदवार कोण? याविषयी उत्सुकता आहे. काल (ता. ११) भाजपचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या उपस्थितीत हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत काही नावांवर चर्चा झाली. त्यात सौ. महाडिक यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, प्रा. जयंत पाटील, भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या नावांवर चर्चा झाली. आमदार विनय कोरे, प्रकाश आवाडे यांच्यासह महाडिक कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

हेही वाचा: दहावी, बारावी परीक्षांचे शुल्क विद्यार्थ्यांना अंशत; परत

भाजपकडून जो उमेदवार दिला जाईल त्याच्या मागे राहण्याची ग्वाही महाडिकांसह श्री. कोरे व श्री. आवाडे यांनी दिली आहे; पण उमेदवार कोण ? याची उत्सुकता होती. आज श्री. पाटील यांनी श्री. महाडिक यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर श्री. पाटील हे भाजपचे सांगलीचे खासदार संजयकाका पाटील यांच्या सांत्वनपर भेटीला निघून गेले, तेथून ते मुंबईला जाणार आहेत. मुंबईत उमेदवारीबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून नांव निश्‍चित करण्यात येणार आहे. पण सद्यस्थितीत उमेदवारीसाठी सौ. महाडिक यांचे नांव निश्‍चित झाल्याचे समजते.

राहुल आवाडे आग्रही

उमेदवारीसाठी राहुल आवाडे हेही आग्रही आहेत. आमदार आवाडे यांनीही आपल्या कुटुंबात उमेदवारी दिल्यास ताकदीने लढण्याची ग्वाही भाजपच्या नेतृत्त्वाला दिली आहे. त्यामुळे आवाडे की महाडिक याविषयीची उत्सुकता उद्या संपुष्टात येण्याची शक्यता आहे.

loading image
go to top