esakal | शिवस्वराज्य दिनाच्या झेंड्यावर भवानी तलवार आणि जिरेटोप
sakal

बोलून बातमी शोधा

शिवस्वराज्य दिनाच्या झेंड्यावर भवानी तलवार आणि जिरेटोप

शिवस्वराज्य दिनाच्या झेंड्यावर भवानी तलवार आणि जिरेटोप

sakal_logo
By
टीम ई सकाळ

कोल्हापूर : शिवराज्याभिषेक दिना दिवशी राज्यभर ‘शिवस्वराज्य दिन’ साजरा करण्यात येणार आहे. ६ जून रोजी साजरा होणाऱ्या या दिनादिवशी राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत शिवस्वराज्य दिन साजरा करावा, असा आदेश ग्रामविकास विभागाने काढला आहे या दिनासाठी विशेष असा ध्वज करण्यात येणार आहे. शिवशक राजदंड स्वराज गुढी उभी करण्यात येणार आहे. या गुढीला भगवा स्वराज्य ध्वजसंहिता लावण्यात येणार आहे हा ध्वज तीन फूट रुंद सहा फूट लांब एवढा असेल हा ध्वज भगव्या रंगाचा असेल त्याची किनार सोनेरी असेल.

हेही वाचा: कोविड सेंटरमध्ये रमली आजी; रिपोर्ट निगेटिव्ह तरी म्हणे घरी जाणार नाही

या ध्वजावर वर जिरेटोप, सुवर्ण होणं, जगदंब तलवार, शिवमुद्रा वागनखे या शिवरायांच्या पंच शुभचिन्ह यांचं चित्र असतील पण कमीत कमी 15 फुटाचा बांबूवर ही गुढी उभी करण्यात येणार आहे. आज जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी या ध्वजासह ६ जून रोजी होणाऱ्या शिवस्‍वराज्य दिनाच्या तयारीचा आढावा घेतला.

loading image
go to top