esakal | शिये-पडळवाडी बायपास मार्ग रद्द करा; मंडलिक, नरके यांची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

शिये-पडळवाडी बायपास मार्ग रद्द करा; मंडलिक, नरके यांची मागणी

शिये-पडळवाडी बायपास मार्ग रद्द करा; मंडलिक, नरके यांची मागणी

sakal_logo
By
सुनील पाटील : सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : अतिवृष्टी आणि पूरबाधित असणारी 300 एकर सुपिक रत्नागिरी, कोल्हापूर-सोलापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी संपादित केली जाणार आहे. हा रस्ता शेतकऱ्यांसाठी अडचणीचा होणार असल्याने शिये-पडळवाडी बायपास मार्ग रद्द करा, अशी मागणी खासदार संजय मंडलिक आणि माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखाराव यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली.

खासदार मंडलिक म्हणाले, जो रस्ता बायपास केला जाणार आहे. तो रस्ता पूरबाधित क्षेत्रात येतो. त्यामुळे या रस्त्याचा हेतू सफल होण्यावर शंका आहे. लोकांकडूनही हा रस्ता रद्द व्हावा, अशी मागणी होत आहे.

माजी आमदार चंद्रदीप नरके म्हणाले, पडळवळवाडी, केर्ली, केर्ले, कुशिरे, निगवे दुमाला, भुये, भुयेवाडी, जठारवाडी, शिये गावातून हा बायपास रस्ता जातो. ही गावे शेतीप्रधान असून या गावांमध्ये उसाचे उत्पादन घेतले जाते. यापैकी काही गावांमध्ये औद्योगिक वसाहती आहेत. त्यामुळे विविध रोजगाराच्या संधीमुळे या परिसरातील लोकसंख्येमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. रस्त्यासाठी जमिन संपादन करण्यासंदर्भात नोटीस प्रसिध्द झाली आहे. यामध्ये सुमारे 400 ते 500 शेतकऱ्यांची सुमारे 300 एकर सुपीक जमिन संपादित केली जाणार आहे.

कोल्हापूर शहराचा नवीन डी.पी.प्लॅन झाला असून यामध्ये याच भागातून नवीन रिंगरोड प्रस्तावित केला आहे. रस्त्यासाठी मार्च 2017 च्या अर्थसंकल्पामध्ये 37 कोटी रुपयांची तरतूद केली प्रस्तावित आहे. यासह कोल्हापूरमूधन कोकणाला जोडणारा रेल्वे मार्गही याच गावांमधून प्रस्तावित आहे. भविष्यात कोल्हापूर महानगरपालिका या गावांसह प्राधिकरण करण्याचा विचार सुरु आहे. ही गावे अतिवृष्टी व पुरबाधित क्षेत्रात आहेत. यात हा रस्ता झाला तर रस्त्याच्या भरावामुळे भुयेवाडी, भुये व शिये गावातील पुराच्या पाण्यामुळे जीवीतहानी व मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान होणार आहे. यशिवाय कोल्हापूर शहरासह कसबा बावड्यालाही याचा फटका बसणार आहे.

नवीन महामार्गासाठी टाकल्या जाणाऱ्या भरावामुळे बाजूची शेतीही पूराने वाहून जाणार आहे. सध्या जो रस्ता नियोजीत आहे. त्या रस्त्याच्या नियोजन कार्यक्षेत्रात 18 हजार टन उसाचे उत्पादन घैतले जाते. त्यामुळे येथील लोक भूमिहिन होणार आहेत. वैभववाडी ते कोल्हापूर हा रेल्वे मार्गही प्रस्तावित आहे. याचही विचार झाला पाहिजे, असेही श्री नरके यांनी सांगितले. यावेळी, जिल्हा परिषद समाजकल्याण समिती सभापती कोमल मिसाळ, भिमराव पाटील, माणिक शिंदे, कृष्णात पवार, विक्रम पाटील, बाबासाहेब पाटील, देवा पाटील उपस्थित होते. महामार्गासाठी पर्यायी मार्ग म्हणून बोरपाडळे, कोडोली, वारणानगर, वाठार ते हातकणंगले असा शंभर फुटी राज्य मार्ग अस्तिवात आहे. याचा विचार झाला पाहिजे. असेही, श्री नरके यांनी सांगितले.

loading image
go to top