esakal | दुकानदार-सुरक्षारक्षकांत वाद
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापूर : दुकानदार-सुरक्षारक्षकांत वाद

कोल्हापूर : दुकानदार-सुरक्षारक्षकांत वाद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : अंबाबाई मंदिर परिसरातील रस्त्यांवरील बॅरिकेडिंगवरून आजही व्यापारी व दुकानदारांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. परिसरातील दुकानदारांना पास दिले आहेत. पण, पास असूनही काहींना न सोडल्याने सुरक्षारक्षक आणि दुकानदारांमध्ये वादाचे प्रकारही घडत आहेत. दरम्यान, उत्सवातील पहिले पाच-सहा दिवस गेले. आता किमान दसऱ्यादिवशीच्या उलाढालीवर तरी परिणाम होऊ नये. त्यासाठी सर्व रस्ते खुले करण्याची मागणी या परिसरातील व्यापारी, दुकानदारांकडून होत आहे. दरम्यान, उद्या (मंगळवारी) बॅरिकेडिंग काढले नाहीत तर बुधवारी (ता. १३) बिनखांबी गणेश मंदिर चौकात व्यापारी व दुकानदारांच्या वतीने भिक-मांगो आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा बी वॉर्ड कृती समितीने दिला.

हेही वाचा: Power Crisis: कोळसा, रेल्वे आणि ऊर्जा मंत्रालयानं स्थापन केला 'आपत्ती गट'

शेखचिल्ली निर्णयाचा निषेध

भवानी मंडपातील व्यावसायिक किरणसिंह चव्हाण यांनी आज सोशल मीडियावरून भावना व्यक्त केल्या. बाहेरगावाचा भाविक दुकानापर्यंत पोचणार नाही, अशीच व्यवस्था प्रशासनाने केली. दुसरीकडे पोलिसांची व सुरक्षारक्षकांची अरेरावी सुरू आहे. दोन वर्षाच्या संकटानंतर आर्थिक आधार मिळण्यासाठी नवरात्रोत्सव चांगली संधी असतानाही व्यापारी व दुकानदारांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. गुजरीतील प्रश्न सोडवला. मग, इतर दुकानदारांनी काय घोडे मारले? कोरोनाकाळात प्रशासकीय कर्मचाऱ्यांचे पगार कापल्यानंतर त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. आता आम्ही काय करायचे? नियमांचे एवढेच असेल तर तुम्ही नऊ दिवस पगार न घेता काम करणार आहात का? हातावरच्या पोटांनी जगायचं कसं? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.

"व्यापारी व दुकानदारांसोबतच्या बैठकीत एक निर्णय घेतला जातो आणि प्रत्यक्षात वेगळेच चित्र आहे. किमान दसऱ्याचा मुहूर्त तरी व्यापाऱ्यांना मिळावा आणि त्यासाठी रस्ते खुले करावेत, हीच आग्रही मागणी आहे."

- किरण नकाते, गुजरी व्यावसायिक

"बॅरिकेडिंगमुळे अंबाबाई मंदिर परिसरातील दुकानदारांच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. उद्या (मंगळवारी) बॅरिकेडिंग काढली नाहीत तर बुधवारी (ता. १३) भीक-मांगो आंदोलन करणार आहे."

- रामेश्वर पत्की, बी वॉर्ड कृती समिती

loading image
go to top