esakal | पुढील निर्णयापर्यंत दुपारी चारनंतर दुकाने बंदच ; डॉ.बलकवडे
sakal

बोलून बातमी शोधा

पुढील निर्णयापर्यंत दुपारी चारनंतर दुकाने बंदच ; डॉ.बलकवडे

पुढील निर्णयापर्यंत दुपारी चारनंतर दुकाने बंदच ; डॉ.बलकवडे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर: अत्यावश्‍यक व जीवनावश्‍यक वगळता शहरासह जिल्हयातील सर्व दुकाने उद्या (ता.९) दुपारी चारनंतर पुढील निर्णायापर्यंत बंदच राहतील. जिल्ह्यात विकेंड लॉकडाऊन लागू असणार आहे. तसेच येथून पुढे दुकाने उघडायची की नाही याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. उद्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक होईल. तीत पॉझीटीव्हीटी रेटबाबत चर्चा होऊन पुढील निर्णय होईल, अशी माहिती प्रभारी जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलवकडे यांनी दिली. shops-closed-after-4pm-design-for-dr-kadambari-balkawade-kolhapur-lockdown-update

नुकताच कोल्हापूर शहराच्या धर्तीवर इचलकरंजीतील सर्व दुकाने उघडण्यास परवानगी देण्याची मागणी वाढली होती. त्यानुसार आरोग्य राज्य मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासह शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. तेथे शुक्रवार पासून सर्व दुकाने उघडण्यास परवानगी मिळण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच मुख्यमंत्री कार्यालयाला स्वतंत्र प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडून द्यावा, असेही मह्टले आहे. याबाबत कोणते आदेश प्रशासनाला प्राप्त झाले आहेत काय या प्रश्‍नावर डॉ.बलकवडे यांनी सांगितले की प्रत्यक्षात याबाबत कोणतेही आदेश जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेले नसले तरीही उच्चस्तरावरील हा निर्णय आहे.

प्रत्येक गुरुवारी एकत्रित होणाऱ्या आकडेवारीवर शुक्रवारी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक होते. त्याची माहिती राज्य शासनाला पाठविली जाते. त्यानुसार सोमवारपासूनचे धोरण निश्‍चित होते. त्यानुसार उद्याच आम्ही प्राधिकरणातील बैठकीचा आढावा शासनाला पाठविणार आहोत. उद्या होणाऱ्या प्राधिकरणाच्या बैठकीतील निर्णयावर सर्व दुकाने सोमवार पासून सुरू होणार की नाही हे ठरणार आहे. याबाबतची नवीन एसओपी रविवारी जाहीर केली जाईल.

दरम्यानच्याकाळात नागरिकांनी, दुकानदारांनी, व्यापाऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे, पॉझिटीव्हीटी रेट कमी होत आहे, तो कमी येण्यासाठी प्रयत्न करावेत, प्रशासनला सहकार्य करावे, असे आवाहन आहे. यावेळी अपर जिल्हाधिकारी किशोर पवार उपस्थित होते.

शाळा सुरू की बंद ?

शाळा आठवी ते बारावी सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. मात्र तरीही जिल्हायातील नऊशेहून अधिक शाळा सुरू असल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी जाहीर केले होते. प्रत्यक्षात या शाळा सुरू करायच्या की नाही हे धोरण अऩिश्‍चित आहे की नाही या प्रश्‍नावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी सांगितले, की आठवी ते बारावी शाळा सुरू ठेवायच्या आहेत, असाच शासनाचा आदेश आहे.

तिसऱ्या लाटेबाबत प्रबोधन होणार

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबद्दल पालकांत भिती आहे. आपले नियोजन काय आहे यावर डॉ.बलकवडे म्हणाल्या,‘‘ माझे विद्यार्थी, माझी जबाबदारी हा उपक्रम प्रबोधनासाठी यासाठी महत्वाचा ठरणार आहे. या माध्यमातून विद्यार्थी आणि पालकांमध्ये जनजागृती घडवून आणणार आहोत. राज्या शासनाकडून येणाऱ्या आदेशानुसार पुढील कार्यवारी केली जाईल.

loading image