'कोल्हापूर शहरातील सर्व दुकाने सुरु करणार'

प्रशासनाच्या विरोधाला संघटितपणे तोंड देण्याचे या बैठकीत ठरवण्यात आले
'कोल्हापूर शहरातील सर्व दुकाने सुरु करणार'
Updated on

कोल्हापूर : कोरोनामुळे शहरातील (covid-19) सर्व दुकाने ८० दिवसापासून बंद आहेत. यापेक्षा जास्त व्यापारी (businessman) संयम बाळगू शकत नाहीत. त्यामुळे शहरातील (kolhapru city) सर्व दुकाने सोमवार (२८) ९ ते दुपारी ४ या वेळेत सुरू करणार आहोत असा निर्धार सर्व व्यापाऱ्यांनी चेंबर ऑफ कॉमर्सच्या (chamber of commerce) बैठकीत आज केला. प्रशासनाच्या विरोधाला संघटितपणे तोंड देण्याचे या बैठकीत ठरवण्यात आले.

या बैठकीमध्ये चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे म्हणाले, कोरोना चाचण्या बाधित रुग्णांची संख्या हा सगळा आकड्यांचा खेळ आहे. प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. मात्र व्यापाऱ्यांवर आता दुकाने बंद ठेवण्याची सक्ती करू नये. गेल्या आठ दिवसापासून दुकाने बंद आहेत. त्यामुळे व्यापारी दुकानातील कामगार यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे सोमवारपासून सकाळी नऊ ते दुपारी चार या वेळेत सर्व दुकाने सुरू करण्याचा निर्णय चेंबर ऑफ कॉमर्स तर्फे घेण्यात आला आहे. प्रशासने विरोध केला तर त्याला संघटितपणे सामोरे जाऊ. असे त्यांनी सांगितले. यावेळी प्रदीपभाई कापडिया, कुलदीप गायकवाड, सीमा जोशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. बैठकीला चेंबर ऑफ कॉमर्स सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

'कोल्हापूर शहरातील सर्व दुकाने सुरु करणार'
कोल्हापुरात पूर्वीप्रमाणेच निर्बंध कायम; हे राहणार सुरु, हे बंद

ही खबरदारी व्यापार्‍यांनी घ्यावी

  • कामगारांचे लसीकरण प्राधान्याने करावे.

  • मालक कामगार सर्वांची कोरना चाचणी घ्यावी.

  • ग्राहकांमध्ये सोशल असिस्टंस राहावा याची काळजी घ्यावी.

  • सर्वांनी मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा.

  • प्रशासकीय अधिकाऱ्यांची हुज्जत घालू नये.

  • दुकान बंद करण्याची सक्ती करण्यात आली तर चेंबरच्या ऑफिसमध्ये संपर्क साधावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Why is MIDC expanding in Kolhapur?
Kolhapur
Kolhapur unauthorized construction demolition drive
Heartbreaking Loss: Breadwinner Dies in Collision, Leaving Behind Wife and Two Children
Marathi News Esakal
www.esakal.com