भटक्या-विमुक्त जमातीची मंगळवारी सामाजिक न्याय हक्क परिषद

भटक्या-विमुक्त जमातीची मंगळवारी (ता. ३१) सामाजिक न्याय हक्क परिषद आयोजित केल्याची माहिती व्यंकाप्पा भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली
भटक्या-विमुक्त जमातीची मंगळवारी सामाजिक न्याय हक्क परिषद
sakal

कोल्हापूर: भटक्या-विमुक्त जमातीची मंगळवारी (ता. ३१) सामाजिक न्याय हक्क परिषद (Social Justice Rights) आयोजित केल्याची माहिती व्यंकाप्पा भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली. ही परिषद दुपारी दोन वाजता रुईकर कॉलनी, प्लॉट नं. ९१ येथे भटके-विमुक्त जमाती विचार मंच येथे होईल.

भटक्या-विमुक्त जमातीची मंगळवारी सामाजिक न्याय हक्क परिषद
राजू शेट्टींच्या टिकेला जयंत पाटलांच प्रत्युत्तर

भोसले म्हणाले, ‘‘१५ ऑगस्ट १९४७ रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाले; पण भटक्या विमुक्त जमाती मात्र १९५२ पर्यंत तीन तारेच्या कुंपणात बंदिस्त गुलाम होते. १९५२ ला भटक्या-विमुक्तांची सोलापूर सेटलमेंटमध्ये भटक्यांची परिषद भरली. परिषदेच्या उद्‌घाटनाला पंतप्रधान पंडित नेहरू आले होते.

परिषदेच्या प्रसंगात भटके-विमुक्त स्वातंत्र्य मिळूनही पारतंत्र्यात असलेले समजले. परिषदेचे उद्‌घाटन करताना पंडित नेहरू यांनी तीन तारेच्या कुंपणाच्या तारा कापल्या. भटक्यांना मुक्त केले. तो ३१ ऑगस्ट दिन भटके स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतात. साजरा करण्यासाठी मेळावे, परिषदा घेतात. आपल्यावर होणारा अन्याय अत्याचाराविरुद्ध आवाज उठवतात.’’

भटक्या-विमुक्त जमातीची मंगळवारी सामाजिक न्याय हक्क परिषद
पंचगंगा नदीत गणेश मूर्ती विसर्जनाला मनाई

ते म्हणाले, ‘‘परिषदेत भटक्या-विमुक्त जमातीची जातवार जनगणना व्हावी. भटक्या-विमुक्तांना संविधानाप्रमाणे अनुसूचित जाती-जमातीमध्ये समावेश करावा. भटक्या-विमुक्त जमातीच्या नोकरदारांना मृत झाल्यावर अनुकंपाखाली वारसा नोकऱ्या मिळत होत्या. दुर्दैवाने २०१६ ला सत्तेवर असणाऱ्या सरकारने अनुकंपाखालील नोकऱ्या रद्द केल्या.

उपेक्षित, वंचित जमातीवर अन्याय केला आहे. त्या शासनाने पूर्ववत सुरू कराव्यात. विमुक्त कैकाडी जमातींना विदर्भात अनुसूचित जातीचे आरक्षण आहे; पण उर्वरित महाराष्ट्रात कैकाड्यांना आरक्षण मिळत नाही; तर क्षेत्रबंधन उठवावे. सहकारात भटक्या-विमुक्तांची नोकर भरती करावी. यशवंतराव चव्हाण घरकूल योजनेप्रमाणे भटक्या-विमुक्त जमातींना घरकूले मिळावीत,’’ यावर चर्चा होणार आहे.

परिषदेच्या अध्यक्षस्थानी भोसले असतील, तर धनाजी गुरव, प्रा. राजाभाऊ शिरगुप्पे, प्रा. सुनील भोसले, प्रा. डी. आर. भोसले, प्रा. डी. डी. चौगुले मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी शिवाजी कोरवी, वसंत कोरवी, गणेश काळे, सुरेश चव्हाण, तानाजी नंदीवाले, रामसिंग रजपूत, दक्षराज भोसले, विजय बाबर, रामचंद्र पोवार, तानाजी गोसावी, बाबू गोसावी, रघुनाथ कांबळे आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com