esakal | सक्तीची कर्ज वसुली थांबवा 
sakal

बोलून बातमी शोधा

Social Organizations Demand, Stop The Forced Debt Collection Kolhapur Marathi News

महाराष्ट्रासह देशभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. आर्थिक अडचणींमुळे कुटुंबाचा गाडा चालविणे मुश्‍किल झाले आहे. या परिस्थितीचा विचार करून बॅंका, वित्तीय संस्थांकडून सुरू असलेली सक्तीची कर्ज वसुली थांबवावी, अशी मागणी विविध राजकीय पक्ष, संघटनांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी प्रांताधिकाऱ्यांना दिले आहे. 

सक्तीची कर्ज वसुली थांबवा 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

गडहिंग्लज : महाराष्ट्रासह देशभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. आर्थिक अडचणींमुळे कुटुंबाचा गाडा चालविणे मुश्‍किल झाले आहे. या परिस्थितीचा विचार करून बॅंका, वित्तीय संस्थांकडून सुरू असलेली सक्तीची कर्ज वसुली थांबवावी, अशी मागणी विविध राजकीय पक्ष, संघटनांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी प्रांताधिकाऱ्यांना दिले आहे. 

गेल्या महिना-दीड महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. महाराष्ट्रासह देशभरात हा व्हायरस पसरलेला आहे. अचानक उद्‌भवलेल्या या संकटामुळे आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. सर्वसामान्यांना कुटुंब चालविणे अडचणीचे झाले आहे. सर्वसामान्य नागरिक, लहान व्यापारी, मजूर, शेतमजूर, कामगार, विधवा-परितक्‍त्या, भाजी व फळ विक्रेते, लहान कारागीर, खासगी वाहनचालक यांनी कोणत्या ना कोणत्या वित्तीय संस्थेतून, बॅंकेतून छोटी-मोठी कर्जे घेतलेली आहेत. 

मार्च महिना सुरू असल्याने या संस्थांकडून कर्ज वसुली सुरू आहे. थकीत कर्ज सक्तीने वसूल केले जात आहे. आर्थिक व्यवहार ठप्प असल्याने आर्थिक अडचणी आहेत. त्यात कर्जाची सक्तीने वसुली सुरू आहे. कर्ज भरण्यासाठी सक्ती झाल्यास भीतीपोटी आत्महत्येसारखी घटनाही घडण्याची शक्‍यता आहे. म्हणूनच वित्तीय संस्थांकडून सुरू असलेली सक्तीची कर्ज वसुली थांबवावी. त्यांना कर्ज स्वेच्छेने भरण्याची मुभा द्यावी. आता कर्ज भरू न शकणाऱ्यांना सहा महिन्यांची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. 

जनता दलाचे तालुकाध्यक्ष बाळेश नाईक, दानिविपचे अध्यक्ष रमजान अत्तार, दलित महासंघाचे माजी अध्यक्ष प्रकाश कांबळे, जिल्हाध्यक्ष बाबूराव आयवाळे, मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले, ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे कार्याध्यक्ष प्रा. आशपाक मकानदार, माजी नगरसेवक चंद्रकांत सावंत, भीमशक्ती संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष परशुराम कांबळे, नगरसेवक हरुण सय्यद, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सिद्धार्थ बन्ने, जिल्हा युवक उपाध्यक्ष महेश सलवादे, उज्ज्वला दळवी, दिगंबर विटेकरी, आरपीआयचे तालुका उपाध्यक्ष रमेश शिंगे, सुवर्णा गोईलकर, कल्पना कांबळे, नाजनिन अत्तार, शिवाजी राऊत, राजेंद्र चव्हाण, साताप्पा कांबळे, आप्पासाहेब भडगावकर, मनोहर दावणे, वंचित आघाडीचे सुरेश थरकार, विठ्ठल भमान्नगोळ आदींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत. 

loading image