इचलकरंजीत सामाजिक कार्यकर्त्याचा निर्घृण खून, धारदार शस्त्राने वार

शिवाजीनगर पोलिसांनी हल्लेखोराचा शोध सुरू केला आहे.
crime news
crime newsesakal

इचलकरंजी : माहिती अधिकाराचा वापर करून विविध गैरप्रकार उघडकीस आणणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश आण्णासाहेब गडगे (वय ५५) यांचा त्यांच्या घरासमोरच निर्घृण खून करण्यात आला. (Ichalkaranji) हल्लेखोराने त्यांच्या मानेवर धारदार शस्त्राने सपासप वार केले. मंगळवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास हा प्रकार घडला. पूर्ववैमनस्यातून हा खून करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज आहे. स्वामी अपार्टमेंटला लागून असलेल्या त्यांच्या घराबाहेरच हा हल्ला झाला. या प्रकारानंतर शहरात खळबळ उडाली. शिवाजीनगर पोलिसांनी (Police) हल्लेखोराचा शोध सुरू केला आहे. (Crime News)

crime news
Nitesh Rane Bail Granted: मोठी बातमी! नितेश राणेंना जामीन मंजूर

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः स्वामी अपार्टमेंटजवळ सुरेश गडगे राहतात. मंगळवारी रात्री जेवण आटोपून फेरफटका मारण्यासाठी ते नेहमीप्रमाणे घराबाहेर पडले. घरासमोर मोकाट कुत्र्यांना बिस्किटे घालत असताना एकाने त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. हल्लेखोराने त्यांच्या मानेवर धारदार शस्त्राने सपासप वार केले. हल्ल्यानंतर त्यांचा जोरजोरात आवाज ऐकून मुलगा साकेत धावत आला. त्यामुळे हल्लेखोराने तेथून पळ काढला. हल्ल्यानंतर मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्याचे पाहून साकेतने त्यांना तातडीने आयजीएम रुग्णालयात हलविले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

crime news
ना मराठी, ना इंग्लिश तांत्रिक बिघाडाने पेपर आले वेगळ्याच भाषेत

दोन वर्षांपूर्वी गडगे यांचा एका व्यक्तीशी वाद झाला होता. या वादातून त्यांचा खून झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. एकीकडे शहरातील अनेक गैरप्रकार उघडकीस आणत असल्याने गडगे शहरात चर्चेत होते; मात्र त्यांचा खून झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी संशयिताचा शोध सुरू केला आहे. हल्ल्याचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही. पोलिस उपअधीक्षक बी. बी. महामुनी यांनी रुग्णालयात भेट देऊन घटनेची माहिती घेतली. सुरेश गडगे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार निर्मूलन संघटनेचे माजी अध्यक्ष होते. भ्रष्टाचारविरोधी जनक्रांती आघाडीचे ते संस्थापक अध्यक्ष होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com