esakal | फुटबॉल स्पर्धेत सोलापूर मॉडर्न अकॅडमीला विजेतेपद

बोलून बातमी शोधा

Solapur Modern Academy Wins Championship In Football Tournament Kolhapur Marathi News

गडहिंग्लज येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनतर्फे चॅम्पस ट्रॉफी फुटबॉल स्पर्धेत सोलापूर मॉडर्न अकॅडमीने बेळगाव विजेता अकॅडमीला दोन गोलने हरवुन विजेतेपद पटकावले. सोलापूरचा मेघराज म्हात्रे स्पर्धावीर ठरला. येथील म. दु. श्रेष्ठी विद्यालयाच्या मैदानावर मैदानावर गेले दोन दिवस सुरू असलेल्या या स्पर्धेत 12 संघाचा सहभाग होता. 

फुटबॉल स्पर्धेत सोलापूर मॉडर्न अकॅडमीला विजेतेपद
sakal_logo
By
दीपक कुपन्नावर

गडहिंग्लज : येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनतर्फे चॅम्पस ट्रॉफी फुटबॉल स्पर्धेत सोलापूर मॉडर्न अकॅडमीने बेळगाव विजेता अकॅडमीला दोन गोलने हरवुन विजेतेपद पटकावले. सोलापूरचा मेघराज म्हात्रे स्पर्धावीर ठरला. येथील म. दु. श्रेष्ठी विद्यालयाच्या मैदानावर मैदानावर गेले दोन दिवस सुरू असलेल्या या स्पर्धेत 12 संघाचा सहभाग होता. 

अंतिम सामन्यात पूर्वार्ध आणि उत्तरार्धात असे दोन सुरेख गोल नोदविणारा सोलापूरचा रिशाक राचरला सामन्याचा हिरो ठरला. सुरवातीपासुन सोलापूरने आक्रमक खेळ करून बेळगावाला जेरीस आणले. बेळगावचा आघाडीपटू शशांक वेरणेकर, अतुल किल्लेदार यांना सोलापूरच्या बचावपटुंनी जखडून टाकल्याने गोल फेडण्याच्या प्रयत्नांना मर्यादा आल्या. बेळगावच्या आदम खानने मारलेला फटका गोलखांबाजवळून गेला. शेवटच्या टप्प्यात बचावात्मक खेळ करून सोलापूरने विजेतेपद निश्‍चित केले. 

सामाजिक युवा कार्यकर्ते अनिकेत कोणकेरी, गडहिंग्लज युनायटेडचे उपाध्यक्ष मल्लिकार्जुन बेल्लद, संचालक संभाजी शिवारे, भैरू सलवादे, किरण दसतुरकर, मानस नायक यांच्या प्रमुख उपस्थित विजेत्या आणि उपविजेत्या संघांना बक्षिसे देण्यात आली. समन्वयक रितेश बदामेने स्वागत केले. स्पर्धा संयोजक दीपक कुपन्नावर यांनी प्रास्ताविकात स्पर्धेची माहिती दिली. ओंकार घुगरी, यासीन नदाफ, सुरज कोडुसकर यानी पंच म्हणून काम पाहिले. भूपेंद्र कोळी याने सूत्रसंचालन केले. सुरज हनिमनाळे याने आभार मानले. 

दरम्यान, उपांत्य फेरीच्या सामन्यात सोलापूरने मिरज युनायटेड फुटबॉल स्कूलला तीन, तर बेळगावने निपाणी फुटबॉल आकादमीचा दोन गोलने पराभव करून अंतिम फेरी गाठली होती. 

स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू 
आघाडीपटू : शशांक वेरणेकर (बेळगाव) 
मध्य रक्षक : अथव साळवे (निपाणी) 
बचावपटू : आदमखान (बेळगाव) 
गोलरक्षक : स्वप्निल मनाकोळ (मिरज)