कोल्हापूर : क्रीडा संकुल जागा हस्तांतर प्रक्रिया सुरू

शेंडा पार्कातील जागेची मोजणी; जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आराखडा मंजुरीसाठी पाठवला
sport
sport sakal
Updated on

कोल्हापूर :  जिल्ह्याच्या क्रीडा विकासासाठी नियोजित जिल्हा क्रीडा संकुलाच्या जागा हस्तांतरणाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली.  नियोजित संकुलासाठी आवश्यक असणाऱ्या शेंडापार्क परिसरातील जागेची मोजणी करण्यात अली असून, प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी पाठवला आहे.

sport
मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १५ जखमी, ५ जण गंभीर

जिल्ह्याचा क्रीडा विकास व्हावा व जिल्हा ‘स्पोर्टस्‌ हब’ म्हणून नावारूपाला यावा या उद्देशाने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, महापालिका व क्रीडा संकुल समिती विशेष प्रयत्न करत आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांनी ऑलिंपिक स्पर्धांचे ध्येय ठेवून येथील खेळाडूंना उत्तम दर्जाच्या क्रीडा सुविधा उपलब्ध असाव्यात यासाठी आराखडा बनवण्याच्या सूचना केल्या होत्या. अखेर नियोजित मैदानाची जागा मोजणीचे काम नुकतेच पूर्ण झाले असून, जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आराखडा मंजुरीसाठी पाठवला आहे. सध्या ही जागा सामाजिक वनीकरण विभागाच्या अखत्यारीत असून, १५ एकर जागेमध्ये सुसज्ज जिल्हा क्रीडा संकुल उभारण्यात येणार आहे.

sport
सिडकोच्या उड्डाणपुलात पर्यावरणमंत्र्यांचा दणका

क्रीडा क्षेत्रात जिल्ह्याचा लौकिक वाढविण्यासाठी खेळाडूंना आवश्यक सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी हे संकुल आवश्यक असून, या ठिकाणी अद्ययावत क्रीडा संकुल उभारताना पार्किंग, मुलां-मुलींसाठी वसतिगृहे, बहुउद्देशीय हॉल प्रत्येक खेळासाठी स्वतंत्र हॉल अशा सुविधा, जिल्हा क्रीडा संकुल आवारात दिव्यांग खेळाडूंसाठी स्वतंत्र सुविधा याठिकाणी निर्माण करण्यात येणार आहेत.

जिल्ह्यासाठीचे हे क्रीडा केंद्र असून, याद्वारे खेळाडूंना अद्ययावत सुविधा मिळणार आहेत. सध्या नियोजित जागेची मोजणी झाली असून, लवकरच ताबा मिळून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.

-डॉ. चंद्रशेखर साखरे, जिल्हा क्रीडा अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com