कोल्हापूर - आत्महत्येच्या प्रयत्नापासून ST कर्मचाऱ्याला रोखले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

st worker

कोल्हापूर - आत्महत्येच्या प्रयत्नापासून ST कर्मचाऱ्याला रोखले

कोल्हापूर : एसटी कर्मचाऱ्याच्या आंदोलनाची दखल घेतली जात नसल्याच्या नैराश्येतून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला अन्य सहकाऱ्यांनी वेळीच रोखले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. सदानंद कांबळे असे त्याचे नाव आहे. या घटनेमुळे बस स्थानक परिसरात खळबळ उडाली होती.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी ः जिल्ह्यातील विविध आगारांतून कर्मचारी मध्यवर्ती बस स्थानकात येऊन ठिय्या आंदोलनात सहभागी होत आहेत. त्याचाच भाग म्हणून गगनबावडा आगारातील एक कर्मचारी आंदोलनात सहभागी होण्यासाठी मध्यवर्ती बस स्थानक परिसरात आला. सहकारी कर्मचाऱ्यांसोबत बोलताना मी आता आत्महत्या करतो, असे तो सांगू लागला. त्याने अचानक टॉवेल गळ्याभोवती गुंडाळला. त्याच क्षणी अन्य सहकारी कर्मचाऱ्यांनी त्याला वेळीच रोखले. त्याच्या कुटुंबीयांना बोलवून घेतले. संबंधित कर्मचाऱ्याला एसटी अधिकाऱ्यांनी बोलावून घेऊन त्याचे समुपदेशन केले. त्यानंतर त्याला घरी पाठवले.

हेही वाचा: उमेदवारीसाठी चुरस: डी. के. शिवकुमार,सतीश जारकीहोळींची बंद खोलीत चर्चा

‘‘एका एसटी कर्मचाऱ्याने चुकीचे कृत्य करण्याचा प्रयत्न केला. त्याला इतर कर्मचाऱ्यांनी तत्काळ रोखले. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. कर्मचाऱ्यांनी संयम बाळगावा.’’

- शिवराज जाधव, विभागीय वाहतूक अधिकारी

loading image
go to top