कोरोना रुग्णांची होम आयसोलेशन सुविधा बंद करा; टास्क फोर्सची सूचना

रुग्ण स्थलांतराच्या काळात रुग्णांची स्थिती अधिक चिंताजनक बनते
कोरोना रुग्णांची होम आयसोलेशन सुविधा बंद करा; टास्क फोर्सची सूचना

कोल्हापूर : सौम्य लक्षणांचे कोरोना रुग्ण (covid-19 patients) होम आयसोलेशन (home isolation) कालावधीत बाहेर फिरतात; तेव्हा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या रुग्णांना 'इन्स्टिट्यूशन क्वारंटाईन' (institutional qurantine) करावे. बाधितांवर खासगी रुग्णालयात चार-आठ दिवस उपचार होतात. पुढे तो रुग्ण गंभीर झाला, की त्याला सीपीआर रुग्णालयात (kolhapur CPR hospital) पाठवले जाते. रुग्ण स्थलांतराच्या काळात रुग्णांची स्थिती अधिक चिंताजनक बनते. हा धोका टाळण्यासाठी खासगी रुग्णालयातही व्हेंटिलेटर आहेत. तेथेच गंभीर रुग्णांवर उपचार झाले पाहिजेत, आदींसह विविध सूचना राज्य शासनाच्या ‘टास्क फोर्स’(task force) ने जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागास केल्या.

जिल्ह्यात बाधित व मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढती आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने जिल्ह्यात टास्क फोर्स पाठवला. त्यात माजी आरोग्य महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे, डॉ. नवले हॉस्पिटल संचालक डॉ. जे. बी. कदम, बालरोगतज्ज्ञ डॉ. आरती किणीकर यांचा समावेश आहे. त्यांनी सीपीआरला भेट दिली. तेथील बाधितांची संख्या तसेच मृत्यू दरवाढीची कारणे याची माहिती घेतली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. ए. डी. माळी यांनी जिल्ह्यातील स्थितीची माहिती दिली.

कोरोना रुग्णांची होम आयसोलेशन सुविधा बंद करा; टास्क फोर्सची सूचना
नाशिकच्या कांद्यासमोर पाक, चिनी कांद्याचे आव्हान!

अनेक रुग्ण खासगी रुग्णालयात (private hospitals) दाखल होतात. तेथे पाच-सहा दिवस उपचार होतात. प्रकृती गंभीर झाली, की त्यांना सीपीआरमध्ये पाठवले जाते. या स्थलांतर काळात रुग्णांची ॲक्सिजनची पातळी खालावते. रुग्ण अतिगंभीर अवस्थेत येतो. अशा रुग्णांचे दाखल झाल्यानंतर ४८ तासांच्या आत मृत्यू झाले आहेत. त्यामुळे एकामधून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये स्थलांतर धोक्याचे ठरत असल्याचे दिसते आहे. अनेक रुग्णांना सौम्य लक्षणे आहेत. त्यांना घरीच उपचारासाठी मुभा आहे; मात्र अनेक जण थोडे बरे वाटले, की घराबाहेर पडतात. त्यातून इतरांना संसर्ग होतो. त्यामुळे बाधितांची संख्या वाढते. अशा स्थितीत होम आयसोलेशन सुविधा बंद करून लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांना हॉस्पिटलमध्येच दाखल करावे. यातून बाधितांची संख्या कमी होण्यास मदत होणार असल्याचे मत समिती सदस्यांनी व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com