"दऱ्याचे वडगाव येथील प्राथमिक शाळेत रिल्स बनवणारे माजी विद्यार्थी होते. त्यांनी फोटो काढणार म्हणून सांगितले होते. पण, रिल्स बनविले. त्या मुलांना समज दिली आहे."
कोल्हापूर : सोशल मीडियावर रिल्स (Social Media Reels) बनवण्यासाठी अनेक जण तरबेज आहेत. काही सामाजिक भान ठेवून आणि समाजोपयोगी रिल्सच्या माध्यमातून जनजागृती करतात. मात्र, दऱ्याचे वडगाव (ता. करवीर) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतच (Zilla Parishad Primary School) बाजीराव सिंघम चित्रपटातील (Bajirao Singham Movie) डायलॉग असणारे रिल्स बनवून सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत.