Success Story : ..अखेर स्वप्न झालं पूर्ण! संसाराचा गाडा सांभाळत कष्टातून शीतल पाटलांची उपनिरीक्षकपदाला गवसणी

घरचा गाडा सांभाळत आणि मिळेल त्या वेळेचा उपयोग करून शीतल यांनी उपनिरीक्षकपद मिळविले.
Success story Sheetal Patil
Success story Sheetal Patil esakal
Summary

एकत्र कुटुंब पद्धतीच्या जोरावर आणि जिद्द, चिकाटीने अभ्यास केल्याने यश मिळविता आले. -शीतल पाटील

परिवार एकता दिन विशेष : एकत्र कुटुंब पद्धतीची ताकद असते. दोनवडे (ता. करवीर) येथे याच एकत्र कुटुंब पद्धतीचा ताकदीवर शीतल युवराज पाटील (Sheetal Yuvraj Patil) यांनी आर्थिक मागास प्रवर्ग, ई डब्लू एस गटातून पोलिस उपनिरीक्षकपद (Sub-Inspector of Police) पदाला गवसणी घातली. घरचा गाडा सांभाळत आणि मिळेल त्या वेळेचा उपयोग करून शीतल यांनी उपनिरीक्षकपद मिळविले. याबद्दल ग्रामस्थांनी त्यांची गावातून मिरवणूक काढली.

शीतल यांचे मूळ गाव केर्ली असून, प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत (Zilla Parishad School) झाल्यानंतर विवेकानंद कॉलेज महाविद्यालयात उच्चमाध्यमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर खराडे कॉलेजमध्ये डीएड पूर्ण केले. विवाहानंतर स. ब. खाडे महाविद्यालय बी. ए. चे शिक्षण पूर्ण केले. दोनवडे (ता. करवीर) येथे शेतकरी बाळू कृष्णा पाटील यांचे चार मुलांचे चौदा व्यक्तींचे एकत्र कुटुंब आहे. या कुटुंबात शीतल पाटील यांचा विवाह युवराज यांच्याबरोबर झाला.

Success story Sheetal Patil
कामगारांच्या डोक्यावरील ओझं होणार कमी; सिंधुदुर्गातील नववीच्या विद्यार्थ्यांनी बनवलं खास 'उपकरण', काय आहे खासियत?

सुरुवातीपासूनच शीतल यांचे अधिकारी होण्याचे स्वप्न होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर २०१८ मध्ये त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. २०१८ मध्ये टीईटी दिली. आमदार जयंत आसगावकर यांच्या सांगरुळ शिक्षण संस्थेच्या डी. डी. आसगावकर ट्रस्टच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रावर त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला.

शिक्षक उदय चोपडे यांचे व बाबासो पोवाळकर, सुभाष पोवार, सरदार भितम यांचे मार्गदर्शन घेत त्यांनी अभ्यासाला सुरुवात केली. एकत्र कुटुंब असल्यामुळे सकाळी पाच वाजता उठून घरचे जेवण तयार करत अभ्यास करायचा, घरचे सर्व काम करत शीतल मिळेल त्या वेळेचा उपयोग करून ऑफलाईन, ऑनलाइन पद्धतीने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला.

Success story Sheetal Patil
म. ए. समितीचा विरोध डावलून कन्नड संघटनांच्या दबावापुढं महापालिका झुकली; मराठी-इंग्रजी भाषेतील हटविले होर्डिंग्ज

जेवण तयार करतानाही त्यांनी ऑनलाईन अध्यापन केले. अशा धावपळीतून वेळ काढत स. ब. खाडे महाविद्यालयात बाबासो पोवाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली फिजिकल प्रॅक्टिस केले. जिद्दीने २०१८ मध्ये आणि २०२० मध्ये दोन परीक्षा दिल्या. २०२० मध्ये परीक्षेमध्ये ५४० पैकी ३५८ गुण घेऊन शीतल उत्तीर्ण झाल्या. हे यश मिळविताना त्यांना कुटुंबाची मदत मिळाली.

मिरवणुकीतून कौतुकाची थाप

दरम्यान, त्याच्या यशाचे गावानेही कौतुक केले. ग्रामस्थांतर्फे शीतल व त्यांचे पती युवराज यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या वेळी भगवान पाटील, शहाजी पोवाळकर, रामचंद्र पोवार, साताप्पा जाधव, कृष्णात पोवाळकर, अशोक पोवाळकर, एस. एम. पाटील, राहू कळके, सरदार पाटील, नामदेव पोवाळकर ग्रामस्थ उपस्थित होते.

एकत्र कुटुंब पद्धतीच्या जोरावर आणि जिद्द, चिकाटीने अभ्यास केल्याने यश मिळविता आले.

-शीतल पाटील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com