कोल्हापूर - महावितरण कार्यालयात शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला.
kolhapur
kolhapuresakal
Updated on: 
Summary

अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला.

मागील काही दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आंदोलन सुरु आहे. शेतीसाठी दिवसा दहा तास वीजपुरवठा मिळत नाही तोपर्यंत ठिय्‍या आंदोलन मागे घेणार नाही, असा निर्धार स्वाभिमानीचे नेते माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केला आहे. दरम्यान, आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महावितरणच्या कार्यकारी अभियंत्याच्या थेट कार्यालयातच शेतकऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. (self-immolation in office of MSEDCL kolhapur)

कोल्हापुरातील महावितरण (Kolhapur News) कार्यालयात कार्यकारी अभियंत्याच्या कार्यालयात शेतकरी निवास पाटील यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला. महावितरणने जिल्ह्यातील बीड, महे, वाशी येथील ग्रामस्थांना नोटीस न देता वीज कनेक्शन तोडले आहे. यामळे या गावातील नागरिक संतप्त आणि आक्रमक झाले आहेत. हे सर्व ग्रामस्थ महावितरण (Mahaviran) कार्यालयात येत वीजतोडणी प्रकरणी आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी शेतकरी निवास पाटील यांनी कार्यलयातच अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी कार्यालयात तणाव निर्माण झाला आहे.

यासाठी दिवसा वीज द्या, शेतकऱ्यांची मागणी

शेतीसाठी रात्री वीजपुरवठा केला जातो. रात्रीच्या वेळी शेतीला पाणी पुरवठा करताना शेतकऱ्यांना सर्पदंश होतो. यातून शेतकऱ्यांचा जीव धोक्यात येत आहे. रात्रीच्या वेळी अपघात होण्याचा संभव वाढता आहे. या बाबी विचारात घेऊन शेतीसाठी दिवसा दहा तास वीज द्यावी, अशी मागणी करीत आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kolhapur Drought, Six Talukas, District Bank Resolution
32-year-old Vikas Chougale drowned in Kasari River
Pune MLC Election, Graduate Teacher Seats,
Maharashtra sugar season
Marathi News Esakal
www.esakal.com