Tasgaon Assembly Constituency Former MP Sanjay Patilesakal
कोल्हापूर
पश्चिम महाराष्ट्रात अजितदादांना बसणार धक्का? 'हा' माजी खासदार भाजपच्या वाटेवर, कार्यक्रमातील उपस्थितीनं वेधलं सर्वांचं लक्ष
Tasgaon Assembly Constituency Former MP Sanjay Patil : पाटील हे भाजपच्या तिकिटावर २०१४ व २०१९ मध्ये सांगली लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. पण, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार पक्षात प्रवेश केला.
Summary
या निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्यापासून ते राष्ट्रवादी अजित पवार पक्षापासून दुरावल्याची चर्चा होती. त्यातच त्यांनी काल भाजपच्या बैठकीला थेट व्यासपीठावरच हजेरी लावून पुन्हा भाजप प्रवेशाचे संकेत दिले आहेत.
कोल्हापूर : सांगली लोकसभा मतदारसंघातून (Sangli Lok Sabha Constituency) भाजपच्या तिकिटावर दोनवेळा खासदार झालेले व विधानसभेच्या तोंडावर राष्ट्रवादी अजित पवार पक्षात प्रवेश करून तासगावची विधानसभा निवडणूक (Tasgaon Assembly Election) लढवलेले माजी खासदार संजय पाटील (Sanjay Patil) पुन्हा भाजपच्या वाटेवर आहेत. (ता. १६) कोल्हापुरात भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या उपस्थितीत झालेल्या पश्चिम महाराष्ट्र संघटन पर्व कार्यक्रमास पाटील यांनी थेट व्यासपीठावर हजेरी लावून हे संकेत दिले आहेत.
