esakal | आजरा तालुक्‍यातील "या' तपासणी नाक्‍यावर नित्याने पोहोचतो चहा-नाष्टा... वाचा निवृत्त बस चालकाची निःस्वार्थ सेवा
sakal

बोलून बातमी शोधा

Tea-Breakfast Facility At The Check Post In Ajra Taluka Kolhapur Marathi News

तुळसीदास एसटी महामंडळातून चालक म्हणून निवृत झाले आहेत. मार्च महिन्यापासून कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाउन सुरू झाले. परराज्यातील येजा करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यासाठी बहिरेवाडी गावाजवळ चेकपोस्ट नाका सुरू केला.

आजरा तालुक्‍यातील "या' तपासणी नाक्‍यावर नित्याने पोहोचतो चहा-नाष्टा... वाचा निवृत्त बस चालकाची निःस्वार्थ सेवा

sakal_logo
By
अशोक तोरस्कर

उत्तूर : कोरोनाच्या लढ्यासाठी अनेकांचे हात मदतीसाठी पुढे येत आहेत. या लढाईत आपला खारीचा वाटा असावा या उद्देशाने बहिरेवाडी (ता. आजरा) येथील तपास नाक्‍यावरील कर्मचाऱ्यांना एका अवलियाने गेली पाच महिने नि:स्वार्थी पद्धतीने मदत केली आहे. या मदतगाराचे नाव आहे तुळसीदास कानडे. 

तुळसीदास एसटी महामंडळातून चालक म्हणून निवृत झाले आहेत. मार्च महिन्यापासून कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाउन सुरू झाले. परराज्यातील येजा करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यासाठी बहिरेवाडी गावाजवळ चेकपोस्ट नाका सुरू केला. याठिकाणी शिक्षक, पोलिस व इतर शासकीय खात्यातील कर्मचारी 24 तास पहारा देतात. हा तपासणी नाका गावापासून एक किमीवर महाराष्ट्र-कर्नाटक हद्दीवर आहे. 

या ठिकाणी चहा-नाष्टा जेवणाची कोणतीही सोय नाही. काम करणारे कर्मचारी आपल्यासाठीच काम करतात या भावनेने तुळसीदास यांनी या कर्मचाऱ्यांना चहा व नाष्टा देणेचा निर्णय घेतला. पहाटे सहा वाजता आपल्या घरी चहा-नाष्टा बनवायचा मोटारसायकलला किक मारायची चहाचा थर्मास व नाष्टा घेऊन तपास नाक्‍यावर जायचे हा त्यांचा दिनक्रम बनला आहे. 

ड्यूटीवर असलेल्या सर्वांनाच ते चहा नाष्टा देतात. पुन्हा दुपारी ते चहा देतात. कोणाकडूनही पैसे न घेता ते नि:स्वार्थी भावनेने ही सेवा करीत आहेत. लॉकडाउनच्या पहिल्या दिवसापासून ते काम करीत आहेत. या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांबरोबर त्यांचे आता जिव्हाळ्याचे संबध निर्माण झाले आहेत. 

दानशूर व्यक्ती 
तुळसीदास कानडे गावात दानशूर व्यक्ती म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी गावातील शाळा सुधार कार्यक्रमासाठी आर्थिक मदत केली आहे. 
- दत्तात्रय चौगुले, प्राथमिक शिक्षक

loading image
go to top