teachers in unsubsidized schools have chosen to become construction workers until school starts
teachers in unsubsidized schools have chosen to become construction workers until school starts

शिक्षक बनले बांधकाम कामगार... का आली ही वेळ...? 

बेळगाव - पगार फक्त पाच हजार. गेल्या चार महिन्यांपासून तोसुद्धा मिळालेला नाही. अशा स्थितीत घर चालविणे केवळ अशक्‍यच. साहजिकच पोटाची खळगी भरण्यासाठी पर्याय तर शोधावाच लागणार. याच गरजेतून विनाअनुदानित शाळांतील काही शिक्षकांनी शाळा सुरु होईपर्यंत बांधकाम कामगार बनणे पसंद केले आहे. काहीजण गवंड्याच्या हाताखाली कामाला जात आहेत. 

भविष्यात संबंधित शिक्षण संस्था आमच्याकडे लक्ष देईल व कायमस्वरुपी नोकरी मिळेल या आशेने जिल्ह्यात अनेक शिक्षक विनाअनुदानित शाळांमध्ये तुटपुंज्या पगारात काम करत आहेत. काही संस्था अधिक सेवा झालेल्या शिक्षकांना कायम करतात. पण, एक ते पाच वर्षे सेवा केलेल्या शिक्षकांना बरीच वर्षे वाट पाहावी लागते. सध्या भरतीही नसल्याने अनेकजण वैतागले आहेत. त्यातच कोरोनामुळे 24 मार्चपासून शाळा व महाविद्यालये बंदच आहेत. शाळा लवकर सुरु होण्याची शक्‍यताही कमी आहे. 

मार्चपासून आतापर्यंत काही संस्थांनी शिक्षकांना पगारच दिलेला नाही. त्यांच्यापुढे उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. संबंधीत शिक्षण संस्थेशी संपर्क साधला असता नवीन प्रवेश नसल्याने संस्था चालविणे मुश्‍किल बनले आहे, अशी उत्तरे दिली जात आहेत. लॉकडाउनमुळे अनेकांच्या नोकऱ्याही गेल्या आहेत. काहींनी इतर व्यवसाय सुरु केले आहेत. काहींनी शेळीपालन तर काहींनी पोल्ट्री व्यवसाय सुरु केला आहे. तर काहींनी बांधकाम कामगार बनण्याचा पर्याय निवडला आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी दुसरा मार्गच नसल्याने त्यांनी हा पर्याय स्वीकारला आहे. शिक्षक संघटनेने याची दखल घेऊन बंदच्या कालावधीतील वेतन मिळवून द्यावे. तसेच संस्थाचालकांशी बोलून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी काही शिक्षकांनी "सकाळ'शी बोलताना केली. 
 

संघटनेमार्फत या प्रकाराची नक्‍कीच चौकशी केली जाईल. तसेच त्यांचा थकीत पगार मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल. कमी पगार असल्याने विनाअनुदानित शिक्षकांना वेगळे पॅकेज देण्याची मागणी आम्ही आधीच केली आहे. आता या मागणीचा नेटाने पाठपुरावा केला जाईल. 
- एकनाथ पाटील, अध्यक्ष, माध्यमिक शिक्षक संघटना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com