Technology Day Special: विद्यापीठातील बहुपयोगी कॉमन फॅसिलिटीचा संशोधकांबरोबर, उद्योगांनाही होणार फायदा

Technology Day Special: विद्यापीठातील बहुपयोगी कॉमन फॅसिलिटीचा संशोधकांबरोबर, उद्योगांनाही होणार फायदा

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात (shivaji University)कॉमन फॅसिलिटी सेंटर आहे. या अंतर्गत सॉफिस्टिकेटेड इन्स्ट्रुमेंटल ॲनॅलिटीकल फॅसिलिटी सुरू आहे. केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाकडून (Ministry of Science and Technology) सुमारे ११ कोटींचा निधी या अधिविभागाला मिळाला. या निधीच्या माध्यमातून विविध उपकरणे, यंत्रे घेतली आहेत. यामुळे विविध चाचण्या घेता येतात. विद्यापीठातील संशोधनाबरोबरच (University Research) औषध निर्मिती, फौंड्री, सिमेंट, रसायन या उद्योगांसाठीही फॅसिलिटी सेंटर उपयोगी पडते.

Technology Day Special Multipurpose Common Facility Center at the shivaji University kolhapur marathi news

- ट्रान्समिशन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप- या मायक्रोस्कोपची किंमत सुमारे पाच कोटी तीन लाख आहे. यात १० नॅनोमीटरपेक्षाही सूक्ष्म आकाराचा घटक स्कॅन करता येतो. याचा उपयोग फौंड्री उद्योगातील काही चाचण्या घेण्यासाठी होतो.

- ग्लास ब्लोइंग मशिन- प्रयोगशाळेतील किंवा कारखान्यात लागणाऱ्या काचेच्या वस्तू या यंत्राद्वारे बनविल्या जातात. विविध प्रकारच्या उद्योगांना याचा उपयोग होतो.

- गॅस क्रोमॅटोग्राफी मास स्प्रेक्टोस्कोपी- याचा उपयोग प्रामुख्याने औषध निर्मिती उद्योगात केला जातो. औषधातील अशुद्धता दूर करण्यासाठीही हे उपकरण उपयोगी पडते. तसेच, वायूंमधील घटकांच्या विलगीकरणासाठीही उपयोगात आणले जाते.

- इंडक्टीव्हली कपल्ड प्लाझ्मा ऑप्टिकल स्‍प्रेक्टोस्कोपी : कोणत्याही धातूमधील अपायकारक घटक शोधण्यासाठी याचा उपयोग होतो. फौंड्री उद्योगातही याचा उपयोग होतो.

- एक्सरे डिफरॅक्शन मशिन- स्फटिक रचना शोधणे, त्यातील शुद्धता तपासणे, स्फटिकांमधील घटकांचे विश्लेषण करणे या गोष्टी या मशिनच्या माध्यमातून केल्या जातात. सिमेंट निर्मिती, फौंड्रीमधील विविध चाचण्यांसाठीही याचा उपयोग होतो.

- बायो ए.एफ.एम. (ऑटोमिक फोर्स मायक्रोस्कोपी)- सरफेस प्रोफाईलचा अभ्यास करण्यासाठी याचा उपयोग होतो. या माध्यमातून युनिफाइड कोटिंग प्रोफाईल बनवण्यात येते.

- मायक्रो रमण- प्रख्यात वैज्ञानिक सी. व्ही. रमण यांचे नाव या उपकरणाला दिले आहे. यातून डायपल मूव्हमेंट अभ्यासता येते. औषधनिर्मिती उद्योगात याचा वापर होतो.

- एक्स.पी.एस. (एक्स रे फोटो इलेक्ट्रॉन स्पेक्ट्रॉस्कोपी)- हे उपकरण राष्ट्रीय उच्चतर शैक्षणिक अभियानांतर्गत (रुसा) घेतले आहे. विविध प्रकारच्या केमिकल बौंडिंग ॲनेलिसिससाठी याचा उपयोग केला जातो.

बहुतांश उपकरणे महाग

यातील बहुतांश उपकरणे महाग आहेत. त्यामुळे उद्योजकांना ती घेणे शक्य होत नाही. पर्यायाने त्यांना विविध चाचण्यांसाठी परराज्यांत किंवा पुणे, मुंबईत चाचण्यांसाठी नमुने पाठवावे लागत होते. मात्र, विद्यापीठात ही सुविधा उपलब्ध झाल्याने त्यांना इथल्या इथेच चाचण्या करणे शक्य आहे.

शिवाजी विद्यापीठातील फॅसिलिटी सेंटर विविध वैज्ञानिक उपकरणांनी सुसज्ज आहे. याचा लाभ विद्यापीठातील संशोधकांना विविध चाचण्या घेण्यासाठी होतोच. मात्र विविध प्रकारच्या औद्योगिक चाचण्या घेण्यासाठी ही उपकरणे उपयोगात येतात.

- प्रा. डॉ. आर. जी. सोनकवडे, अधिविभागप्रमुख, फॅसिलिटी सेंटर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com