Kolhapur; रंकाळा, दाभोळकर कॉर्नर, टाऊन हॉल येथे होणार उड्डाणपुल 

प्रशासक कादंबरी बलकवडे : 237 कोटींचा आराखडा, दोन भुयारी मार्ग
 kadambari balkawade
kadambari balkawadeesakal

कोल्हापूर :  पापाची तिकटी ते रंकाळा, दाभोळकर कॉर्नर ते दसरा चौक, टाऊन हॉल ते जयंती नाला चौकापर्यंतच्या उड्डापुल तर, दाभाळे कॉर्नर व  खासबाग मैदान येथे भुयारी मार्ग करण्यासाठी लागणारा एकूण 237 कोटी 47 लाख रुपयांचा निधी अपेक्षीत असल्याचे सांगून कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासक कादंबरी बलकवडे (Kadambari Balkawade ) शहराचा आराखडा सादर केला.

महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पाच्यापार्श्‍वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात जास्ती-जास्त निधीची मागणी व्हावी, यासाठी पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी सकाळी 8 ते सायंकाळी साडेपाच पर्यंत विविध विभागांची आढावा बैठक़ घेतली यावेळी त्या बोलत होत्या.

 kadambari balkawade
अर्थसंकल्पीय Budget म्हणजे फक्त स्वप्नांचा मनोरा; राजू शेट्टी

प्रशासक बलकवडे म्हणाल्या, महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान (राज्यस्तर) मूधन राज्य शासनाकडून पापाची तिकटी ते रंकाळ तलाव उड्डाण पुलासाठी 48 कोटी, दाभोळकर कॉर्नर ते दसरा चौक उड्डाण पुलासाठी 69 कोटी 60, टाऊन हॉल ते जयंती नाला चौक उड्डाण पुलासाठी 34 कोटी 80 लाख रुपये, दाभाळे कॉर्नर येथे भुयारी मार्ग करण्यासाठी 3 कोटी 86 लाख रुपये व खासबाग मैदान येथे भुयारी मार्ग करण्यासाठी 4 कोटी 45 लाख रुपये असा एकूण 237 कोटी 47 लाख रुपयांचा निधी अपेक्षीत आहे. तसेच प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत रंकाळा परिसर विकसीत, जतन व संवर्धन करण्यासाठी 4 कोटी 80 लाख रुपये मंजूर आहेत. यापैकी 1 कोटी 50 लाख रुपये मिळाले असून उर्वरित निधी मिळणे अपेक्षीत आहे. कसबा बावडा ई वॉर्ड येथील पॅव्हेलियन मैदानासाठी जलतरण तलावासाठी 90 लाख रुपये व मंगेशकरनगर येथे क्रीडा हॉल बांधण्यासाठी 1 कोटी 20 रुपयांचा निधीही प्रस्तावित आहे. नागरी दळणवळण साधनांचा विकास या अंतर्गत कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील नागरी रस्त्यांच्या कामासाठी 237 कोटी 47 लाख रुपयांचा निधी अपेक्षीत असून राज्य शासनाकडून यंदाच्या अर्थसंकल्पात हा निधी मंजूर करावा, अशी मागणी बलकवडे यांनी केली.

पोलीस गृहनिर्माणकडून 300 कोटी : शैलेश बलकवडे 

पोलीस गृहनिर्माणकडून कोल्हापूर जिल्ह्यात पोलीस मुख्यालयासाठी 300 कोटी रुपये, लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यासाठी 50 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. याशिवाय, गडहिंग्लज पोलीस लाईन येथे 125 निवासस्थाने करावीत यासाठी प्रस्ताव देत आहे. शहापूर पोलीस ठाण्यासाठी 3 कोअी 67 लाख व भुदरगड पोलीस ठाण्यासाठी 3 कोटी 68 लाख रुपये निधी मंजूर असून अद्याप तो वर्ग झालेला नसल्याचे पोलीस अधिक्षक डॉ. शैलेश बलकवडे यांनी सांगितेल. गोकुळ शिरगाव पोलीस ठाणे 2 कोटी 5 लाख, कळे 4 कोटी 16 लाख व कागल पोलीस ठाण्यासाठी 5 कोटी 4 लाख रुपये मंजूर झाला आहे. तो मिळावा,अशीही मागणी बलकवडे यांनी केली.

जिल्हा आरोग्य विभागामध्ये नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र बांधकामासाठी 41 कोटी 88 लाख रुपये, राष्ट्रीय आरोग्य अभियानातून आरोग्य उपकेंद्र नवीन बांधकाम व दुरुस्तीसाठी 35 कोटी 69 लाख 40 हजार, कोरोनाच्यापार्श्‍वभूमीवर राष्ट्रीय आरोग्य अभियान 33 कोटी 98 लाख तसेच इतर योजनांसाठी एकूण 142 कोटी 75 लाख 40 हजार रुपयांचा निधीची मागणी केली आहे.

तिर्थक्षेत्राचे 71 कोटी प्रलंबित

करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर तिर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी प्रलंबित असणारा 71 कोटी 76 लाखांचा निधी. अंबाबाई मंदिर तिर्थक्षेत्र विकासासाठी 79 कोटी 96 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. यापैकी 8 कोटी 20 लाख रुपये निधी वगळता उर्वरित 71 कोटी 76 लाख रुपये निधी शासनाकडून तात्काळ मिळणे अपेक्षीत असून दोन वर्षात ही कामे पूर्ण करावी लागणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com