क्वारंटाईन व्यक्ती फिरल्यास होणार ५ हजार दंड ; विनामास्क फिरणाऱ्यांवरही होणार कारवाई

There will be a fine of Rs 5 000 if the quarantine person goes around
There will be a fine of Rs 5 000 if the quarantine person goes around
Updated on

कागल : विनामास्क व क्वारंटाईन व्यक्ती फिरताना आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय पालिकेच्या बैठकीत आज झाला. विनामास्क फिरणाऱ्यांना ५०० तर क्वारंटाईन व्यक्ती फिरताना दिसल्यास ५ हजार रुपये दंड करण्यात येणार असल्याचे  नगराध्यक्षा सौ. माणिक माळी यांनी सांगितले.
कोरोना महामारीच्या संसर्गावर उपाययोजना करण्यासाठी नगराध्यक्षा माणिक माळी यांच्या अध्यक्षतेखाली आज सदस्य आणि अधिकारी यांची बैठक बोलाविली होती. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रेयश जुवेकर, पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे, डॉ. सुनीता पाटील, नगरसेवक प्रवीण काळबर नितीन दिंडे, बाबासाहेब नाईक उपस्थित होते. 

शहरात कोरोनाच्या रुग्णांत वाढ होत आहे. त्यामुळे शहरात लॉकडाऊन करता येईल का?  याबाबत चर्चा झाली. विनामास्क आणि क्वारंटाईन झालेल्या व्यक्ती फिरताना आढळल्यास  ५०० रुपये तर क्वारंटाईन व्यक्तीला ५ हजार दंड करण्याचा निर्णय नगराध्यक्षा माणिक माळी यांनी जाहीर केला. व्यापाऱ्यांनी दुकानात मास्क वापरणे बंधनकारक केले. मास्क न लावता खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना साहित्य न देण्याच्या सूचना देण्यात आल्या.

बैठकीस नगरसेवक आनंदा पसारे, राजाराम निंबाळकर, आरोग्य निरीक्षक अभिजित गोरे यांच्यासह शहरातील व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

  संसर्ग टाळण्यावर एकमत
  क्वारंटाईन व्यक्तीला दंड 
  विनामास्क फिरणाऱ्यांना दंड
  व्यापाऱ्यांनाही मास्क बंधकारक

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Gokul Election 2026 Latest Update
PM Kisan 2026 Kolhapur farmers e-KYC Aadhaar bank linking
Satej Patil vs Hasan Mushrif
Gokul Election 2026
Marathi News Esakal
www.esakal.com