esakal | राजस्थानच्या ‘007’ टोळीला मोका....
sakal

बोलून बातमी शोधा

Three gangsters from Rajasthan have been cleared for action under MOCA

किणी टोल नाक्‍यावर हुबळीकडून पुण्याच्या दिशेने जात असलेल्या राजस्थानमधील ००७ गॅंगमधील तिघा गुंडांना २८ जानेवारीला पोलिसांनी जीवाची पर्वा न करता जेरबंद केले होते.

राजस्थानच्या ‘007’ टोळीला मोका....

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - दरोडा, सरकारी नोकरांवर हल्ला, खुनाचा प्रयत्न, खंडणी असे गंभीर गुन्हे दाखल असणाऱ्या राजस्थान येथील ००७ टोळीतील तीन गुंडांवर मोकाअंतर्गत कारवाईस विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांनी आज मंजुरी दिली. आंतरराज्य टोळीवर अशा पद्धतीची ही जिल्ह्यातील पहिलीच कारवाई ठरली.

महानिरीक्षकांची प्रस्तावाला मंजुरी; २८ गुन्हे दाखल 

किणी टोल नाक्‍यावर हुबळीकडून पुण्याच्या दिशेने जात असलेल्या राजस्थानमधील ००७ गॅंगमधील तिघा गुंडांना २८ जानेवारीला पोलिसांनी जीवाची पर्वा न करता जेरबंद केले. शाम ऊर्फ शामलाल गोरधनराम पुनीया, श्रीराम पाचाराम बिष्णोई, श्रवणकुमार मनोहरलाल मांजू ऊर्फ बिष्णोई (तिघे रा. जोधपूर, राजस्थान) हे तिघे गुंड झालेल्या गोळीबारात जखमी झाले होते. उपचारानंतर तिघांना अटक केली होती. तपासात टोळीवर राजस्थानमध्ये २८ गुन्हे दाखल असल्याची माहिती पुढे आली. याच गुन्ह्यांच्या आधारे संबंधित टोळीवर मोका अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिले. त्यानुसार प्रस्ताव तयार केला. प्रस्तावास विशेष पोलिस महानिरीक्षक यांनी मंजुरी दिली. 

टोळीतील तिघे संशयित गुंड हुबळी येथे वास्तव्यास होते. त्यांच्या मार्गावर राजस्थान पोलिस लागल्यानंतर त्यांनी तेथून पुण्याला निसटण्याचा प्रयत्न केला होता. ते ज्यांच्या संपर्कात होते. त्याची माहिती घेतली जात आहे. त्याचा जर या टोळीशी संपर्क आढळला तर त्याच्यावरही मोकाअंतर्गत कारवाई केली जाईल, असे देशमुख यांनी सांगितले.

loading image