
Sangli : सांगली शहरातील वाल्मिकी आवास येथे रेकॉर्डवरील गुन्हेगार सौरभ बापू कांबळे (वय २०) याचा भरदिवसा निर्घृण खून करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अवघ्या १२ तासांत जेरबंद केले. या खून प्रकरणी दोघांसह दोन अल्पवयीन मुलांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अटक केलेल्यात करण महादेव गायकवाड (वय २०, राजीव गांधी नगर, सांगली) आणि युवराज हणमंत कांबळे (१९ टिंबर एरिया, नवीन वसाहत, सांगली) यांचा समावेश आहे. सांगली शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने थरारक पाठलाग करून पकडले.