जनतेच्या मनातील लोकराजा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

hasan mushrif
मुश्रीफ पुरवणी लेख

जनतेच्या मनातील लोकराजा

माणसांचा समुद्र आपल्याभोवती हेच आपलं ''विजयधन''आहे. मीपणा सोडून माणसं जोडणं हेच तुमचं ''स्वाभिमानी'' जगणं आहे. मंत्री मुश्रीफ यांची प्रचंड इच्छाशक्ती, दुर्दम्य आशावाद झोकून देऊन अखंड काम करण्याची तयारी असल्यामुळे खऱ्या अर्थाने जनतेच्या मनातील ते लोकराजे झाले आहेत. तरुणांना लाजवेल अशा पद्धतीने त्यांची काम करण्याची सचोटी आहे. से. कापसीच्या माळावर साखर कारखाना उभा करून त्यांनी शेतकऱ्यांच्या जीवनात खऱ्या अर्थाने नंदनवनच फुलवले आहे. त्यामुळेच ते कागल तालुक्याच्या विकासाचे खरेखुरे पाईक आहेत. त्यांची काम करण्याची धडाडी पाहूनच जनता त्यांच्यामागे कार्यकर्त्यांची फळी उभी करत आहे. कार्यकर्त्यांवर मनापासून प्रेम करणारे व त्यांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणारे ते लोक नेतेच आहेत. तालुक्यातीलच नव्हे तर जिल्ह्यातील अनेक प्रश्नांवर त्यांनी आवाज उठवला आहे. त्यासाठी त्यांचा नेहमी संघर्ष असतो. पराभवाने खचून जाणे, हताश होणे हा मंत्री मुश्रीफ यांचा स्वभावधर्म नाही. प्रचंड इच्छाशक्ती, दुर्दम्य आशावाद, अखंड काम करण्याची तयारी आणि जनतेवरील निष्ठेच्या जोरावरच आजपर्यंत त्यांची वाटचाल सुरू आहे. राजकारणातून त्यांना पदे मिळत गेल्यानंतर त्यांनी जनतेशी असणारी नाळ कधी तोडली नाही, तत्त्‍वांशी कधीही फारकत न घेणारे ते राजकारणातील चाणक्य आहेत.
- डी. एम. चौगले, सोनाळी

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :KolhapurHasan Mushrif
go to top