रोटरीचा ट्रेड फेअर कौतुकास्पद
03330
------------
रोटरीचा ट्रेड फेअर कौतुकास्पद
प्रांताधिकारी डॉ. विकास खरात; इचलकरंजीमध्ये उद्घाटन
इचलकरंजी, ता. २४ : घरगुती साहित्यापासून इलेक्ट्रिक वाहन व इतर उपयोगी वस्तू एकाच ठिकाणी मिळण्याचे म्हणजे रोटरी क्लब आयोजित रोटरी ट्रेड फेअर आहे. सामाजिक उपक्रमांसाठी होणारे हे ट्रेड फेअर कौतुकास्पद असल्याचे मत प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांनी केले.
येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यानजीक ग्राउंडवर रोटरी क्लब आयोजित रोटरी ट्रेड फेअरच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. पोलिस उपाधीक्षक बी. बी. महामुनी यांनी दोन वर्षांमध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रोटरी ट्रेड फेअर भरवता आले नाही, मात्र यंदा उत्कृष्ट नियोजन करून भरवलेल्या ट्रेड फेअरमध्ये खरेदीसाठी चांगली संधी असल्याचे सांगितले.
रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रकाश रावळ यांनी स्वागत व प्रास्तविक केले. मान्यवरांचा सत्कार केला. रोटरीचे सत्यनारायण धूत, अभय यळरुटे, रोटरी अॅनस क्लबच्या अध्यक्षा अलका रावळ, सचिव मेघा घायतिडक यांची प्रमुख उपस्थिती होती. संजय घायतिडक यांनी आभार मानले. मनीष मुनोत यांनी सूत्रसंचालन केले. यंदा रोटरी ट्रेड फेअरचे एकविसावे वर्ष आहे. पाच दिवस चालणाऱ्या या ट्रेड फेअरमध्ये विविध प्रकारचे आकर्षक स्टॉल मांडले असून, त्यामध्ये खवय्यांसाठीही अनेक स्टॉल आहेत. लहान मुलांच्या मनोरंजनासाठी खेळणी बसवली आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.